सोलापूर, 04 जुलै: एका वर्षाच्या बाळाला ओलीस ठेवून (1 year old baby taken hostage) चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा (Robbery) टाकल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी एका वर्षाच्या बाळाला ओलीस ठेवून घरातील पाच तोळे सोनं आणि काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. त्यानंतर चोरट्यांनी चिमुकल्याला शेजारच्या टाकून दिलं होतं. या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित कुटुंबानं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली आहे. घटनेचा तपास सुरू केला आहे.
संबंधित घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बीबी दारफळ येथील एका निर्मनुष्य वस्तीवर चोरट्यांनी हा दरोडा टाकला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी संबंधित वस्तीवर आले. कुटुंबाला काही कळायच्या आत चोरट्यांनी एका वर्षाच्या बाळाला ओलीस ठेवलं. तसेच आरडा ओरडा करण्याचा किंवा चलाखी करण्याचा प्रयत्न केला, तर बाळाची हत्या करू अशी धमकी देत घरातील पाच तोळे सोनं आणि काही रक्कम लुटली आहे.
हेही वाचा-हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या
पीडित सोनल साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दरोडेखोरांनी फिर्यादीच्या घरातील 2 तोळ्यांचे गंठण आणि अंगठीसह चाडेचार तोळे सोनं असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला आहे. यानंतर चोरट्यांनी ओलीस ठेवलेल्या बाळाला शेजारच्या एका शेतात टाकून पळ काढला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित कुटुंबानं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.