काम सुरू असतानाच पडलं लोखंडी शेड; एक जागीच ठार, 2 गंभीर

काम सुरू असतानाच पडलं लोखंडी शेड; एक जागीच ठार, 2 गंभीर

लोखंडी शेड अंगावर पडून एक जण ठार झाला आहे, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

यवतमाळ, 25 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात असलेल्या राईस मिलचे काम सुरू आहे. या कामादरम्यान मजूर काम करीत असताना मिलचे लोखंडी शेड अंगावर पडून एक जण ठार झाला आहे, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मोहम्मद निजामुद्दीन मोहम्मद मज्जित असं मृताचं नाव आहे. तो मूळ आदीलाबाद येथील रहिवासी आहे. कामा निमित्त काही मजूर या ठिकाणी आले होते. राईस मिलचे बांधकाम सुरू असताना आज अचानक लोखंडी शेड कोसळले. या घटनेत मोहम्मद निजामुद्दीन हा ठार झाला. तर त्याचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले.

जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार राजेश साळवे करीत आहेत.

हेही वाचा - CCTV : इंंडिकेटर न देताच गाडी वळवली; मागून Activa वरुन येणाऱ्या विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू

दरम्यान, या दुर्दैवी घटनेत एका कामागाराचा हकनाक बळी गेल्याने कळंब परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 25, 2020, 9:32 PM IST
Tags: jalgaon

ताज्या बातम्या