मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकतर्फी प्रेमाचा जीवघेणा अंत, आधी मुलीचा गळा चिरला, नंतर तरुणाने विहिरीत घेतली उडी!

एकतर्फी प्रेमाचा जीवघेणा अंत, आधी मुलीचा गळा चिरला, नंतर तरुणाने विहिरीत घेतली उडी!

आर्णी तालुक्यातील येरमल हेटी इथं एका 17 वर्षीय मुलीवर अमन जाधव नावाच्या तरुणाने प्राणघातक हल्ला केला

आर्णी तालुक्यातील येरमल हेटी इथं एका 17 वर्षीय मुलीवर अमन जाधव नावाच्या तरुणाने प्राणघातक हल्ला केला

आर्णी तालुक्यातील येरमल हेटी इथं एका 17 वर्षीय मुलीवर अमन जाधव नावाच्या तरुणाने प्राणघातक हल्ला केला

यवतमाळ, 14 मार्च :  एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने  17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केला. हल्ला करून काही तास उलटत नाही तेच आरोपी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळमधील आर्णी तालुक्यात घडली.

आर्णी तालुक्यातील येरमल हेटी इथं एका 17 वर्षीय मुलीवर आज दुपारी गोलू उर्फ अमन जाधव नावाच्या तरुणाने प्राणघातक हल्ला केला होता. मुलगी घरी एकटी असताना गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. जखमी झालेली मुलगी ही पुण्याच्या एका महाविद्यालयात 12 वीला शिक्षण घेत होती. होळीच्या निमित्ताने गावात आली असताना अमनने तिच्यावर हल्ला केला. जखमी मुलीची प्रकृती चिंताजनक असून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

अमनने हल्ला केल्यानंतर तिथून पसार झाला. फरार झालेल्या अमन जाधवचा पोलीस शोध घेत होते. परंतु, काही तासांनंतर केळझरा तांड्याजवळ शेतातील अमनने विहिरीत  उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

भर चौकात तरुणाला टोळीकडून जीवघेणी मारहाण

दरम्यान, मनमाडमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.  3 ते 4 जणांनी अत्यंत निर्दयीपणे लाठा-काठ्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. दोन गटात गेल्या काही वर्षां पासून वाद होताच. हा वाद इतका विकोपाला गेला की 3 ते 4 जणांनी मिळून या एका तरुणाला बेदम मारहाण केली.

यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांनी दिली. काठ्यानी एका टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मनमाडच्या डॉ. आंबेडकर चौकात घडली. पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर 4 जण अद्यापही फरार आहेत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 11 जाण विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पोलिसांना 7 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे.

First published:

Tags: Crime, Yavatmal, Yavatmal news