लग्नाला नकार दिला म्हणून त्याने घटस्फोटीत महिलेच्या डोक्यात घातला दगड

लग्नाला नकार दिला म्हणून त्याने घटस्फोटीत महिलेच्या डोक्यात घातला दगड

मागील एक वर्षांपासून सुनील पीडितेची छेड काढत होता.

  • Share this:

बीड,23 फेब्रुवारी:घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरूने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी पेठ भागात घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव आहे. सुनील जाधव याचे महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. या एकतर्फी प्रेमातून सुनीलने महिलेवर हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांना आरोपी सुनील जाधव याला अटक केली आहे.

बीड शहरातील पेठ बीड पोलिस स्टेशनच्या एमआयडीसी भागात राहणाऱ्या 23 वर्षीय घटस्फोटीत महिलेच्या डोक्यात दगड घालण्याची घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. यावेळी पीडित महिलेने सांगितले की, मागील एक वर्षांपासून सुनील तिची छेड काढत होता. यापूर्वी तिने सुनीलविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी सुनीलला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून समजही दिली होती. तरी देखील तो महिलेची छेड काढत होता. एवढेच नाही तर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होता. सुनीलच्या त्रासाला कंटाळून तिला ब्युटी पार्लरचा क्लास अर्ध्यात सोडावा लागला होता.

कोंबड्यांची झुंज आणि मालकाचा मृत्यू, असं प्रकरण ज्यात आरोपी समोर असून नाही पकडू शकले पोलीस

घटस्फोटीत आहे महिला

पीडित महिला घटस्फोटीत आहे. ती सध्या वडिलांकडे राहते. 'मागील एक वर्षभरापासून सुनील जाधव हा माझ्या मुलीला सतत छेडतो व आता तर त्याने डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीच्या जीवितास धोका असून याची दखल बीड पोलिसांनी घ्यावी, अशी मागणीही पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पेठ बीड पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे.

गोव्यामध्ये सरावादरम्यान MiG-29K विमान कोसळलं, पायलट सुरक्षित

First published: February 23, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या