मुंबईत हॉस्पिटलमध्ये आग : रुग्णाला MRI मशिनमधून काढून वाचवला जीव

मुंबईत हॉस्पिटलमध्ये आग : रुग्णाला MRI मशिनमधून काढून  वाचवला जीव

आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान आहे.

  • Share this:

मुंबई,17 डिसेंबर : मुंबईतल्या अंधेरीमधल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत रुग्णांचा श्वास कोंडला आहे. प्रचंड धुरामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहेत. एका रुग्णाने त्याचा धक्कादाय अनुभव सांगितला. त्या रुग्णाची MRI चाचणी सुरू होती, त्याच सुमारास आग लागली. तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाला तातडीनं मशिनमधून बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.

4 थ्या, 5 व्या आणि 6 व्या मजल्यावर गंभीर परिस्थिती आहे. 4 थ्या मजल्यावर आयसीयू असून तिथे नेमकी काय परिस्थिती आहे हे अजुन स्पष्ट झालेलं नाही.

फायर ब्रिगेडचे कर्मचारी ऑक्सिजन सीलेंडर लावूनमध्ये गेले आहेत.

अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग लागली. रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे.

रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

धुराचे लोट कमी करण्यासाठी हॉस्पिटलच्या काचाही फोडण्यात येत आहेत. आतमध्ये काही डॉक्टरही अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

First published: December 17, 2018, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading