शिर्डीत ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

शिर्डीत ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिर्डी जवळील राहाता शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, (प्रतिनिधी)

शिर्डी, 24 जुलै- ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिर्डी जवळील राहाता शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी घेवून जात आरोपी अनिल किसन थोरात याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या हाताला हिसका देऊन पळाल्याने मुलगी बचावलीय. मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या असणाऱ्या एक नराधमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वेळीच मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतल्याने ती वाचली. आरोपी अनिल थोरात याच्याशी एक मैत्रिणीमुळे ओळख झाली होती. त्यातूनच 22 जुलै रोजी आरोपी अनिल थोरात अल्पवयीन मुलीला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने मुलीचा हात पकडत मला तू आवडतेस असे म्हणत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेल्या मुलीने आरोपीच्या हाताला जोरदार हिसका देत तेथून पळ काढल्याने तिच्यावरील अतिप्रसंग टळला. सुरूवातीला मुलीने भीतीपोटी घरच्यांना काहीही सांगितले नाही. मात्र, मंगळवारी (23 जुलै) मुलीने हिम्मत करून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार मामाला सांगितला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल किसन थोरात याच्या विरोधात भादंवि कलम 363, 354, 354 (अ) (ड) 506 तसेच बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अनिल किसन थोरात याला ताब्यात घेतल्याची माहिती राहाता येथील पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिली.

VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमबाजाला तीन तरुणांची बेदम मारहाण..

Published by: Sandip Parolekar
First published: July 24, 2019, 4:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading