भिवंडीत चालकास चालत्या ट्रकमध्ये आकडी आल्याने मृत्यू, बस-कारचा अपघात टळला

भिवंडीत चालकास चालत्या ट्रकमध्ये आकडी आल्याने मृत्यू, बस-कारचा अपघात टळला

ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला.

  • Share this:

भिवंडी, 13 ऑक्टोबर : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर लोढा धाम या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH 04 HS1273 वरील ट्रक चालक बाबुराव खोत यांचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चालक बाबुराव खोत यांना भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर पोहोचल्यानंतर अचानक आकडी आल्याने त्यांचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला येऊन धडकला. त्यानंतरही खोत हे ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर तडफडत होते. हा प्रकार रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाबुराव खोत यांना खाली उतरवलं. या सर्व घटनेत बाबुराव खोत हे बेशुद्ध झाले.

हेही वाचा - टाळं न तोडता शटरमधूनच घुसून चोरट्यांनी लुटलं दुकान; अशी चोरी पाहून पोलीसही हैराण

दरम्यान, या घटनेबाबतची माहिती मिळातच नारपोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकास आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असता तो मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाबुराव खोत हे सकाळी ताप आलेला असतानाही कामावर येऊन ट्रकमध्ये माल भरून निघाले होते, अशी माहिती त्याच्या परिचितांनी पोलिसांना दिली आहे.

मोठा अपघात टळला

चालक बाबुराव खोत यांचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. यावेळी विरुद्ध दिशेने येणारी एसटी बस व कार चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला.

Published by: Akshay Shitole
First published: October 13, 2020, 10:00 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading