खळबळजनक! विहिरीत आईसह 4 चिमुकल्यांचा सापडला मृतदेह

गावाच्या एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 10:57 AM IST

खळबळजनक! विहिरीत आईसह 4 चिमुकल्यांचा सापडला मृतदेह

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 23 सप्टेंबर : बुलढाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडला आहे. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथे हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गावाच्या एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढलले आहेत. यात एक मृतदेह महिलेचा तर त्यासोबत 4 चिमुकल्यांचा मृतदेह आढळला आहे. मृतांमध्ये आई आणि 4 मुली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आई उज्वला ढोके वय 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.

धक्कादायक! पहिल्यांदा छेड काढली नंतर वारंवार दिराने केला वहिनीवर बलात्कार

Loading...

दरम्यान, आईसह 4 मुलींची नेमकी हत्या करण्यात आली की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटनेची उकल होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणाची आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलीस कुटुंबीयांची आणि स्थानिकांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तोंडावर टॉवेल टाकून अल्पवयीन मुलीला पळवलं, नराधमाकडून शेतात बलात्कार

शाळकरी मुलीवर बलात्कार झाला असल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथला हा संतापजनक प्रकार आहे. अल्पवयीन मुलीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी आरोपी नराधमाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोणज इथल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रामणणा शिवशंकर केदार अशा आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीला न्यालयाने 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने तीव्र निषेध वक्त केला जात आहे.

इतर बातम्या - रत्नागिरी: राष्ट्रवादी शिवसेनेला करणार 'चेकमेट'; रिंगणात आणणार तगडा उमेदवार

खेडवर इथल्या चिदानंद स्वामी यांच्या शेतात सायंकाळी 5 दरम्यान  शाळकरी मुलगी (वय 15) ही शाळेतून घरी जाताना नराधाम रामणणा केदार याने पाठीमागून टॉवेल टाकून तिला शेतातील ऊसामधे ओढत नेलं. तिने विरोध केल्यामुळे तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने  पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपीवर 363,323 बाललैंगिक अत्याचार कायदे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...