विर्दभात विषारी कीटकनाशकामुळे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

विर्दभात विषारी कीटकनाशकामुळे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

मिसळ रविवारी मुलासह कपाशीवर किटकनाशक फवारण्यासाठी गेले होते नागपूरात हलवल्यानंतर तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

नागपूर, 04 ऑक्टोबर:   विदर्भात  आतापर्यंत 20 शेतकऱ्यांचे किटकनाशकाच्या विषबाधेमुळे मृत्यू  झाले आहेत. शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने  आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

नागपूरच्या भिवापूरच्या घामणगावातील घटना घडली आहे.  प्रभाकर मिसळ या शेतकऱ्यांचा  तीन दिवसांच्या उपचारांनतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाला मृत्यू. मिसळ रविवारी मुलासह कपाशीवर किटकनाशक फवारण्यासाठी गेले होते नागपूरात हलवल्यानंतर तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्यात घातक किटकनाशकाच्या विषबाधेमुळे आतापर्यंत 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या प्रकरणातील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहिर केली आहे पण ही मदत तोकडी असल्याचं सांगत सुकाणू समितीने शेतकरी आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबईत रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत ठार झालेल्या मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत आणि यवतमाळमधील किटकनाशकांच्या विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना फक्त दोन लाखांची मदत हा अन्याय असल्याच सुकाणु समितीने आंदोलनाची हाक दिली आहे.

त्यामुळे आतातरी या प्रकरणाची योग्य तपासणी होते का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

First published: October 4, 2017, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading