पिंपरी-चिंचवडमध्ये सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण संख्या 16 वर

पिंपरी-चिंचवडमध्ये सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण संख्या 16 वर

पुणे विभागातील एकूण रुग्णांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे.

  • Share this:

पुणे, 15 मार्च : पुणे विभागात आज आणखी एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 16 रुग्ण झाले आहेत. कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली आजची व्यक्ती ही पिंपरी- चिंचवड भागातील आहे. ही व्यक्ती नुकतीच जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची 14 मार्चला चाचणी करण्यात आली, त्याबाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुणे विभागातील एकूण रुग्णांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे.

पुणेकरांनो फक्त प्रशासनाने सांगितलेल्या या 21 गोष्टी नीट लक्षात ठेवा!

1. कोरोनाबाबत फार घाबरू पण नका आणि अगदीच बिनधास्त पण राहू नका

2. परीक्षा सुरू असलेल्या कॉलेजमध्ये होस्टेल सोडण्याचे आदेश नाहीत

3. सर्व खासगी रूग्णालये एका अ‍ॅपद्वारे पेशंट्सचा सर्व डेटा अपडेट करतील तो प्रशासनाला थेट मिळेल

4. संशयितांवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करू. पण या लोकांनी स्वत:ला घरातच कॉरनटाईन करून घ्यावे, अन्यथा त्यांना तिथून वेगळं केलं जाईल

5. एका व्यक्तीची सर्वांना शिक्षा नको, परदेशवारी करून आलेल्यांनी प्रशासनाला कळवणं बंधनकारक, त्यांनी आपल्याच घरात स्वत:ला आयसोलेट करून घ्यावं

6. आपल्या कुटुंबियांसोबतही त्यांनी संपर्कात येऊ नये

7. कालचे चार पॉजिटिव्ह रूग्ण संसर्गामुळेच वाढलेत

8. काल आम्ही मॉलही बंद केलेत, फक्त त्यातील मेडिकल्स आणि जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरू राहतील

9. शाळा कॉलेजेस बंद असले तरी मुलांनी होस्टेल अथवा घराबाहेर पडू नये

10. डीपीडीसी बजेटमधून कोरोना साथ नियंत्रणाचा हा सर्व खर्च केला जाईल

11. लोकांनी रस्त्यावर मास्क घालून फिरू नये, मास्क हे फक्त मेडिकल स्टाफसाठीच आहेत

12. मास्क लावून कोरोना संशयितांनी आपली ओळख लपवू नये

13. संशयितांनी रस्त्यावर फिरूच नये

14. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर सरळ गुन्हे दाखल करू

15. फस्ट कॉन्टॅक्ट आलेले 4 संशयित पॉजिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे

16. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर इथे अजून एकही कोरोना पॉजिटिव्ह सापडलेला नाही

17. यापुढे फस्ट कॉन्टॅक्टबाबतही आणखी खबरदारी घेणार, होम क्वॉरनटाईन बाबत अधिक काळजी घेणार

18. लोकांनी घरं सोडू नयेत, ही कळकळीची विनंती, शासन आदेशाचं पालन करावं

19. संशयीत कुटुंबावर बहिष्कार टाकणं पुरोगामी पुणे शहराला शोभत नाही

20. सोसायट्यांनी असे प्रकार टाळावेत, अन्यथा संबंधित सोसायटी अध्यक्ष, सेक्रेटरींना थेट निलंबित करणार

21. Mpsc च्या 31 मार्च पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील, याबाबत एमपीएससी पुढचे आदेश जारी करेनच

First published: March 15, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या