लष्कराच्या रणगाड्याचा बॉम्ब चोरून माळरानावर नेला, पुढे जे घडलं ते...

लष्कराच्या रणगाड्याचा बॉम्ब चोरून माळरानावर नेला, पुढे जे घडलं ते...

जवानांचा सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक इथं निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात

  • Share this:

साहेबराव कोकणे,प्रतिनिधी

अहमदनगर, 14 फेब्रुवारी : शत्रूशी दोन हात करण्यासाठी आपले जवान कसून सराव करतात. लष्कराच्या के.के. रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करीत असताना त्याचा स्फोट होऊन एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. भीमा गायकवाड असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने इथं घडली. अहमदनगर मधील के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडवण्याचा सराव चालतो. रनगाडे आणि तोफगोळ्यांचा सराव सुरू असताना काही चुकीचे वेध लागल्यामुळे बॉम्ब तसेच पडलेले असतात. निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्त केली आहे.

परंत, जवानांचा सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक इथं निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. निकाम झालेले तोफगोळे आणि त्यातील दारू काढून काही जण विक्री करत असतात.

मात्र, खारेकर्जुने येथील काही लोक ठेकेदारांची नजर चुकून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्बचे भंगार साहित्य गोळा करतात. आजचा प्रकारही असाच घडला. येथील काही तरुण निकामी झालेले बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेले होते.

यावेळी या तरुणांच्या हाती एक भरलेला बॉम्ब सापडला. भरलेला बॉम्ब सापडल्यानंतर खरंतर त्यांनी याबद्दल लष्कराच्या अधिकाऱ्यांना किंवा ठेकदाराला सांगणे गरजेचं होतं. परंतु, तसं न करता या तरुणांनी हा बॉम्बसोबत नेला.

लष्कराच्या हद्दीतून दूर गेल्यानंतर या तरुणांनी हा बॉम्ब माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की,  यात भीमा गायकवाड हा जागीच ठार झाला.

स्फोटामुळे भीमा गायकवाडच्या शरीराचे तुकडे तुकडे दूरपर्यंत फेकले गेले. यापूर्वीही अशा घटना येथे घडल्या आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

First published: February 14, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading