पार्किंगच्या वादातून तिघांनी केली बेदम मारहाण, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू

पार्किंगच्या वादातून तिघांनी केली बेदम मारहाण, हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू

बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून महेश बडगुजर यांना लाथा बुक्याने बेदम मारहाण केली.

  • Share this:

वसई, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे बंद असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, वसईत कार पार्किंगच्या किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी  पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

वसईत किरकोळ वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सोसायटीच्या परिसरात महेश बडगुजर (वय 40 ) हे आपली कार पार्किंग करत होते. त्यावेळी  कार पार्किंगच्या वादावरून सुभाष राठोड ,अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण यांच्यासोबत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून महेश बडगुजर यांना लाथा बुक्याने बेदम मारहाण केली.

हेही वाचा - दिवा शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ, संपूर्ण मुंब्रादेवी परिसर सील

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेश बडगुजर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच वसई पोलिसांनी सुभाष राठोड, अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण या तिघांना तात्काळ अटक केली असल्याचे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 12, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading