सचिन जिरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद, 10 डिसेंबर: संगणक प्रिंटरच्या मदतीनं चक्क ग्राहक सेवा केंद्रात शंभर, दोनशे, आणि दोन हजाराच्या बनावट नोटा ऑर्डरप्रमाणे छापून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बनावट नोटा छापून साथीदाराच्या मदतीने विविध जिल्ह्यात कमी दरात विकणारी टोळीतील तिघांच्या औरंगाबादमधील सिडको पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
संदीप श्रीमंत आरगडे (वय-32, रा. इटखेडा पैठण, धंदा ड्रायव्हर), निखील आबासाहेब संबेराव (वय-29, पहाडसिंगपुरा आणि आकाश संपती माने (वय-32, रा. धारुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. धारूर येथील आकाश माने हा या टोळीचा मोहरक्या असल्याचं समजते.
हेही वाचा...अत्यंत घृणास्पद! मूकबधीर तरुणीवर अत्याचार, नंतर दगडानं ठेचून केली निर्घृण हत्या
शंभर, दोनशे आणि दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणणार्या तिघांना सिडको पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 76 हजार 450 रुपयांच्या बनावट नोटा आणि 93 हजार 800 रुपयांचे प्रिंटर आणि इतर साहित्य असा 3 लाख 70 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोर्टानं तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेली माहिती अशी की, या गुन्ह्यातील म्होरक्या आकाश माने असून त्याचे धारुर येथे ग्राहक सेवा केंद्र आहे. याच्याच ताब्यातून प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील संजय गांधी मार्केटमधे आरगडे आणि संबेराव यांना बोगस नोटासहित अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी माने याला धारुरला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडून आणले.
संदीप आरगडे हा शिवनेरी ट्रॅव्हल्सवर ड्रायव्हर असून मुख्य आरोपी मानेचा नातेवाईक आहे. तर संबेराव हा कमिशन बेसेसवर लोकांचे बॅकांमधून कर्ज मंजूर करुन देण्याचे काम करतो. गेल्या एक महिन्यांपासून तिन्ही आरोपी बोगस नोटा तयार करत होता.
हेही वाचा...शिवसेनेचं अखेर ठरलं! स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत घेतला मोठा निर्णय
आतापर्यंत किती बोगस नोटा चलनात आणल्या याचा तपास पोलिस निरीक्षक गिरी करंत आहेत. पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पीएसआय बाळासाहेब आहेर, पोलिस कर्मचारी दिनेश बन, नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, गणेश नागरे यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी सिडको पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून या टोळीने कोणकोणत्या जिल्ह्यात बनावट नोटा विकल्या आहेत त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news