हेडफोन लावून गोवा महामार्गावर दुचाकी चालवणं तरुणाच्या जीवावर बेतलं

हेडफोन लावून गोवा महामार्गावर दुचाकी चालवणं तरुणाच्या जीवावर बेतलं

मुंबई-गोवा महामार्गावर हेडफोन लावून दुचाकी चालवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. दुचाकी घसरून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

चंद्रकांत बनकर (प्रतिनिधी)

रत्नागिरी, 11 मे- मुंबई-गोवा महामार्गावर हेडफोन लावून दुचाकी चालवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. दुचाकी घसरून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिल शेट्टे (वय-25) असं मृत तरुणाचे नाव आहे. कानात हेडफोन लावून तो दुचाकी चालवत होता.खेड तालुक्यातील बोरज येथे हा अपघात झाला. मृत तरुण हा राजापूर येथील रहिवासी आहे. खेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेडफोन लावून रेल्वे ट्रॅकवर रनिंग करणाऱ्या तरुणाला एक्स्प्रेसनं चिरडलं, छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

दरम्यान, कानात हेडफोन लावून रेल्वे ट्र्रॅकवर रनिंग करणाऱ्या तरुणाला एक्स्प्रेसने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंबमध्ये 8 मे रोजी सायंकाळी साडे पाचला ही घटना घडली. शफीक सज्जन आतार (वय-34) असे मृत तरुणाचे नाव आहे.

राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल

First published: May 11, 2019, 3:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading