Home /News /maharashtra /

लातूर : मुकुंदचे पोलीस भरतीचे स्वप्न भंगले; सकाळी व्यायाम करायला गेला अन् मृतदेहच आला घरी 

लातूर : मुकुंदचे पोलीस भरतीचे स्वप्न भंगले; सकाळी व्यायाम करायला गेला अन् मृतदेहच आला घरी 

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ अत्यंत दुर्देवी पद्धतीने गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  लातूर, 16 मे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांसोबत दुर्दैवी (Two Friend Accident) घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे पोलीस भरतीसाठी (Police Bharti) ते दररोज सारखे रस्त्याच्या बाजूने व्यायाम करत होते. यावेळी दोन्ही मित्रांना कारने (Car Accident in Latur) चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मुकिंद रामराव मुंढे असे 24 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तो लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील रहिवासी होता. तर प्रतिक पांडुरंग मुंढे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दगडवाडी येथील मुकिंद रामराव मुंढे आणि प्रतिक पांडुरंग मुंढे हे दोन्ही वर्गमित्र होते. मुकिंद याचे शिक्षण डी. फार्मसी पर्यंत झाले होते. तो एका मेडिकल दुकानावर काम करायचा. तर प्रतिक हा आसाम रायफलमध्ये भरती झाला आहे. दोन्ही मित्र पोलीस भरतीसाठी गावाच्या जवळ असलेल्या एका पुलाजवळ व्यायाम करायचे. रविवारीही ते नेहमीप्रमाणे, सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी अंबाजोगाईकडून अहमदपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने या दोघांना धडक दिली. एमएच 14, एस 7970 क्रमांकाच्या कारने हे दोन्ही जण चिरडले गेले. हेही वाचा - Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; नंदुरबारमध्ये गुन्हा अदखलपात्र दाखल, लॅपटॉपही जप्त होणार
  एकुलता एक मुलाचे निधन -
  या दुर्दैवी अपघातात मुकिंद मुंढे हा तरुण जागीच ठार झाला. तर जखमी प्रतिक मुंढे याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे हा अपघात झाला. विशेष म्हणजे, कार डाव्या बाजूकडून थेट उजव्या बाजूला असलेल्या कठड्याकडे घुसली. अपघातात मृत्यू झालेला मुकिंद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तर त्याला चार बहिणी आहेत. मात्र, घरातील एकुलता एक मुलगा, पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारा मुंकुंदचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Accident, Death, Latur

  पुढील बातम्या