दुचाकीचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू

दुचाकीचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू

भुसावळ नाक्याजवळील महाराष्ट्र धाब्याच्या समोर दुचाकीचे (एम.एच. 19ए.सी. 7131) टायर फुटल्यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, २२ एप्रिल- यावल-भुसावळ रस्त्यावर दुचाकीचे समोरील टायर अचानक फुटून झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला तर दोघे जखमी झालेत.  ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

भुसावळ नाक्याजवळील महाराष्ट्र धाब्याच्या समोर दुचाकीचे (एम.एच. 19ए.सी. 7131)  टायर फुटल्यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला. शेख अजीम शेख सैफुद्दीन (25, रा. अडावद ता.चोपडा ) मृताचे नाव आहे. दोन्ही जखमीना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

शेख कलीम शेख बशीर व  व रईस गुलाम रसूल हे दोघे गंभीर जखमी झाले. हे तिघे एकाच दुचाकीवरुन घरी जात असताना हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच कदीर खान, हाफीज खान सुभान खान, शेख आलीम, शेख अजहर, रहिम शेख, सईद शाह, शेख करीम, जफर मोमीन, फारूख मुन्शी, शेख नईम आणि हवालदार गोरख पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉ. स्वाती कवडीवाले, आरती कोल्हे, नेपाली भोळे, प्रवीण बारी आदींनी उपचार केले. यानंतर दोघाना पुढील उपचाराकरिता जळगावला हलवण्यात आले. मृतक शेख अजीमच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

First published: April 22, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading