गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, 20 फूट नेले फरपटत

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, 20 फूट नेले फरपटत

मुंबई-गोवा हायवेवर मंगळवारी सायंकाळी खवटी गावानजीक ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, (प्रतिनिधी)

रत्नागिरी, 3 सप्टेंबर: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले. एवढेच नाही तर ट्रकने दुचाकीस्वाराला तब्बल 20 फूट फरपटत नेले. मुंबई-गोवा हायवेवर मंगळवारी सायंकाळी खवटी गावानजीक ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, मृत तरुणाची अद्याप ओळख पटली आहे. हा तरूण गणेशोत्सवासाठी कोकणात येत होता. त्याला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रामदास कदम मदतीला धावले..

हा अपघात झाला तेव्हा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे मुंबईहून खेडकडे येत होते. अपघाताच्या ठिकाणी ये मदतीला देखील धावले. त्यांनी स्वत: पोलीस स्टेशनला फोन करून तात्काळ मदत मागवली.

मुंबईसह कोकण परिसरात जुलैसारखा पाऊस; हवामान विभागाने दिला अलर्ट!

दरम्यान गणरायाच्या स्वागतासोबत राज्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्रने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टीवर चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत. पण सकाळपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील किनारपट्टीभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हपूर, सातारा, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसानं दडी मारली असल्यानं बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मुसळधार पाऊस पडून दे आणि दुष्काळ दूर होऊदे असं गणरायाला राजकारणी नेत्यांपासून भाविकांपर्यंत सर्वांनी साकडं घातलं आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ, छत्तीसगड, गोवा या भागांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता.

प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: September 3, 2019, 7:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या