अडूळजवळ दुचाकी-गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

अडूळजवळ दुचाकी-गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

औरंगाबाद-बीड महामार्गावरील अडूळ गावाजवळ दुचाकी आणि गाडीचा भीषण अपघात होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाला.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 3 जुलै- औरंगाबाद-बीड महामार्गावरील अडूळ गावाजवळ दुचाकी आणि गाडीचा भीषण अपघात होऊन एकाचा जागेवरच मृत्यू झाला. हॉटेल स्वामिनीसमोर बुधवारी (3 जुलै) हा अपघात झाला. बंडू बाबुराव पिवळ असे मृत व्यक्तीचे नाव असून तो किनगाव चौफूली येथील रहिवासी आहे.

लाच स्विकरताना गंगापूरच्या उपनिरीक्षकास रंगेहात अटक

गुन्ह्यांतून वाचविण्यासाठी व्यापाऱ्याकडून 30 हजारांची लाच स्विकरताना गंगापूर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकास लाच लुतपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. गजेंद्र इंगळे असे लाच स्विकारणाऱ्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याच उपनिरीक्षकांचे काही महिन्यांपूर्वी भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पेरणीसाठी पैसे नाहीत करावं काय? या विवंचनेतून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

पेरणीसाठी पैसे नाहीत करावं काय, कर्ज कसं फेडावे, या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे उघडकीस आली आहे. बाळासाहेब रामभाऊ गायकवाड (वय- 40) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

बाळासाहेब गायकवाड वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील रहिवासी होते. सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून पहाटे 5 च्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. सततची नापिकी तसेच डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे ते विवंचनेत अडकले होते. शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे साडेसहा एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 60,000 हजार तर डीसीसीबँकेचे 70,000 रुपये कर्ज आहे. बाळासाहेब गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी व तीन लहान मुले आहेत. गायकवाड कुटूंबाची परिस्थिती अंत्यत बिकट आहे. घरातील कर्तापुरुष निघून गेल्याने गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

First published: July 3, 2019, 6:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading