मुक्ताईनगरात जिलेटीनच्या स्फोट घडवून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या

मुक्ताईनगरात जिलेटीनच्या स्फोट घडवून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या

मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा हे गाव शुक्रवारी पहाटे जिलेटीनच्या स्फोटाने हादरले. अज्ञात नागरिकांनी जिलेटीनचा स्फोट घडवून 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, 7 जून- मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा हे गाव शुक्रवारी पहाटे जिलेटीनच्या स्फोटाने हादरले. अज्ञात नागरिकांनी

जिलेटीनचा स्फोट घडवून 22 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. आकाश राजू वरखेडे असे मृत तरूणाचे नाव आहे. आकाशच्या खाटखाली जिलेटीनचा स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी की, आकाश हा आपल्या अंगणात खाटेवर झोपला होता. एका अज्ञात व्यक्तीने जिलेटीनची कांडी त्याच्या खाटेखाली लावून स्पार्किंग करत स्फोट घडवून आणला. त्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटमुळे संपूर्ण गावात हादरा बसला व गावकऱ्यांनी स्फोट झाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी जाऊन तपासणी केली. यात एका व्यक्तीच्या घरात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा असून घटनास्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

आकाश वरखेडे याचा मृतदेह मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं प्रकरणाला वेगळं वळण, प्रियकराला अटक!

मुंबईसह संपूर्ण देशात रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. एक्स्प्रेसमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना एका बॅगमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळल्या. मुंबईत घातपाताचा कट तर नाही ना अशी भीती वर्तवली गेली. बरं एवढंच नाहीतर जिलेटिनच्या कांड्यासोबत पोलिसांना एक पत्र सापडल. हिंदीत असलेल्या या पत्रात भाजप सरकारविरोधात मजकूर आहे. 'या भाजप सरकारला दाखवून द्यायचं, आम्ही काय करू शकतो. आमचा पंजा पडल्यावर काय होते. तुम्हाला त्या चार जणांच्या संपर्कात राहायचे आहे. आम्ही काय करू शकतो हे आम्ही आताच दाखवून देऊ शकतो.' असा मजकूर या पत्रात होता.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

First published: June 7, 2019, 4:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading