• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रविवारची सुट्टी त्यात अमावस्या! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू

रविवारची सुट्टी त्यात अमावस्या! पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू

रविवारच्या सुट्टी मज्जा एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. मित्रासोबत कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक थोडक्यात बचावला.

  • Share this:
जळगाव, 19 जुलै: रविवारच्या सुट्टी मज्जा एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. मित्रासोबत कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक थोडक्यात बचावला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. चेतन अरूण पाथरवट (वय-31) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्यात आज अमावस्या आणि ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा...'हिंदू हृदयसम्राट यांचे चिरंजीव सत्तेत आसताना साधू, संत, कीर्तनकारांवर अन्याय' मिळालेली माहिती अशी की, आसोदा रोड परिसरातील श्रीराम नगर येथील राहणारा चेतन अरूण पाथरवट (वय-31) व त्याचा मित्र सागर पाटील (रा. कांचन नगर) हे दोघे दुचाकीने शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर रविवार सुट्टीच्या निमित्ताने फिरण्यासाठी गेले होते. दोघांनाही कांताई बंधाऱ्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. यातील चेतन अरूण पाथरवट याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्याने आरडाओरड केल्याने काही तरूणांच्या त्याला पाण्याच्या बाहेर काढलं. त्यामुळे तो बाचावला. घटनेची माहिती मिळाताच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी सतीश हळनोर, विलास पाटीलसह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पाण्यात बुडालेल्या चेतन पाथरवट या तरुणाचा शोध सुरू आहे. या कामात धानोरा (ता. जि.जळगाव) येथील तरूणांची मदत घेण्यात येत आहे. हेही वाचा...कोरोनाची दहशत वाढली! रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यानं पाचव्या मजल्यावरून मारली उडी दरम्यान, शनिवारी नाशिकमध्ये वेलदेवी धरणात बुडून तीन मित्रांचा मृत्यू झाला होता. सध्या लॉकडाऊन आहे. आणि पाऊसही चांगला होत आहे. त्यामुळे काही हौशी तरुण नदी, धरणावर फिरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published: