सरकारी खोड्यांमुळे पत्नीनं गमावला 'आधार', उपासमारीनं पतीचा मृत्यू

सरकारी खोड्यांमुळे पत्नीनं गमावला 'आधार', उपासमारीनं पतीचा मृत्यू

बुलडाण्यात आधार लिंक न केल्यामुळे एका वयोवृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

प्रफुल खंडारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 29 सप्टेंबर : बुलडाण्यात आधार लिंक न केल्यामुळे एका वयोवृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. गोविंदा गवई या वयोवृद्ध व्यक्तीला आधार क्रमांक नसल्यामुळे रेशनमधून धान्यच मिळालं नाही. त्यामुळे घरात उपासमारी आली आणि त्यात त्यांचा जीव गेल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या बायकोने आता सरकार दरबारी धाव घेतलीये. घटनेतील दोषींवर त्यांनी कारवाईची मागणी केलीये. सरकारी अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं उत्तर दिलंय.

गरिबांना अल्प दरात धान्य मिळून दिवसाला लागणारा उष्मांक मिळवता यावा यासाठी सरकारने गावोगावात स्वस्थ धान्य दुकान थाटली आहेत. मात्र येथे येणारा राशनचा जास्तीत जास्त माल जातो कुठे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बहुदा बुलडाणा जिल्ह्यात वारंवार काळाबाजारात जाणारं रेशन पकडलं गेलंय. त्यावरून हे स्पष्ट होतंय. मात्र मुद्दा तो नाहीये..!

याच बुलडाणा जिल्ह्यात एका गावात या रेशनच्या धान्यासाठी एकाचा जीव गेला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानिमित्ताने रेशन धान्य पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचा पुन्हा एकदा काळा चेहरा समोर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील  जयपूर या छोट्याश्या गावात गोविंदा गवई आणि पंचफुला गवई हे वयोवृद्ध दांपत्य राहतं. उतार वयात काम होत नसल्याने आणि बायको पंचफुलाबाई या अपंग असल्यानं त्यांचा कुटुंबाचा गाढा कसाबसा रेशनच्या अनाजावर चालतो. मात्र, गेल्या 2 ते अडीच महिन्यापासून गावातील रेशन दुकानदार या न त्या कारणाने रेशन देण्यास नकार मिळत होता. त्यामुळे पोटाची खळगी वेळेवर भरता न आल्यानं उपासमारीनं गोविंदा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांचा पत्नीने केलाय.

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार स्थानिकांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिला. या लोकप्रतिनिधींनी देखील हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्याचं सांगत गरिबांना सरकारी खोड्यामुळे अन्नापासून वंचित ठेऊ नका अशी भावना व्यक्त केली.

या प्रकरणात या महिलेनं आता सरकार दरबारी धाव घेतली असून दोषींवर कारवाईची मागणी पुढे येतेय. सरकारी अधिकाऱ्यांनीदेखील तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सरकारी उत्तर दिलंय.

एकीकडे स्वस्थ धान्य गरिबांना घरपोच मिळण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा राज्यात असताना शासकीय अनास्थेपाई जर भूक बळी जात असेल तर यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकते.

VIDEO : रोडरोमिओची चप्पलेनं धुलाई; म्हणाला..'ताई मला जाऊ द्या'!!

First Published: Sep 29, 2018 09:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading