Home /News /maharashtra /

कुत्र्याला वाचवताना कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू

कुत्र्याला वाचवताना कारला अपघात, एकाचा जागीच मृत्यू

कारंजा तालुक्यातील कामरगांव येथील अब्दुल अजिज हे आपल्या परिवारासह परत येत होते.

    किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 01 फेब्रुवारी : नागपूर-मुंबई या महार्गावरील म्हसला फाट्यानजीक कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  अमरावती येथून कामरगावकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातातएक जण जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर - मुंबई या महामार्गावरील म्हसला फाट्यानजीक घडली. या बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कायमचं Work Form Home करावं लागणार? कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील अब्दुल अजिज अब्दुल हकीम ( वय 29 वर्षे ) हे आपल्या परिवारासह कार क्रमांक MH 27 H 1783 परत येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा आडवा आल्यानं त्यांच्या कारचा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला आहे. Valentine Day 2021: कोरोना काळात असा साजरा करा व्हॅलेंटाईन डे; काय गिफ्ट्स द्याल या कार अपघातात अब्दुल अजीज हे घटनास्थळीच ठार झाले असून अब्दुल अजीम अब्दुल हकीम ( वय 32 वर्षे ),असिया परवीन अब्दुल अजीम ( वय 24 वर्षे )  आणि तीन वर्षीय मुलगा महफुज अब्दुल अजीम हे तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठीअमरावती येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास धनज पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत. नागपुरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या दरम्यान, नागपूर जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये एका दाम्पत्याने मुलीसहआत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. श्याम गजानन नारनवरे (वय 46) सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि कु. समिता समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी तीनही मृतकांची नावे आहे.  हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे. श्याम नारनवरे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, अशी माहिती आहे. मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: अपघात, वाशिम

    पुढील बातम्या