Home /News /maharashtra /

भिवंडीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, हॉटेलमधील चहा ठरला अखेरचा

भिवंडीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, हॉटेलमधील चहा ठरला अखेरचा

इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्यामुळे हॉटेलात चहा पित बसलेल्या एकाचा मृत्यू झाला तर इतर दोघं गंभीर जखमी झाले आहेत.

    भिवंडी, 4 जानेवारी: भिवंडीत (Bhivandi) इमारत कोसळल्यामुळे (Building collapse) एका तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुन्या इमारतीचा (Old building) भाग अचानक कोसळला. या इमारतीच्या खाली एक हॉटेल (Hotel) सुरू होतं. तिथं चहा पिण्यासाठी बसलेल्या तीन तरुणांपैकी एकाच या घटनेत मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.  अशी घडली दुर्घटना भिवंडीतील खाडीपार परिसरात असणाऱ्या एका 20 वर्ष जुन्या इमारतीचा भाग अचानक कोसळला. याच इमारतीच्या खाली ‘सागर किनारा’ नावाचं हॉटेल सुरू होतं. या हॉटेलमध्ये त्या वेळी तिघे चहा पित बसले होते. इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर तिघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यापैकी दोन तरुण गंभीर झाले तर एकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बचाव आणि मदत पथकाने धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली आहे.  इमारत होती जुनी ही इमारत साधारण 20 वर्षं जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. जुनी असली तरी ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली नव्हती. या इमारतीचा एक भाग अगोदरच खचला होता आणि त्यानंतर एक भाग कोसळला. ही इमारत खचलेली दिसत असल्यामुळे या इमारतीत फारसे रहिवासी नव्हते. मात्र ही इमारत कोसळल्याचा भुर्दंड या इमारतीशी संबंध नसणाऱ्या नागरिकांना भोगावा लागत असल्याचं चित्र आहे.  हे वाचा - MMRDA वर नाराजी हा परिसर MMRDA परिसरात येत असून यंत्रणेकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील अनेक इमारती धोकादायक झाल्या असून तिथं हजारो नागरिक राहत आहेत. या इमारतींचं नव्यानं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी पुढं येत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bhiwandi, Death

    पुढील बातम्या