बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन गुजरातशी, नागपुरात एक कोटीचे बियाणे जप्त

बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन गुजरातशी, नागपुरात एक कोटीचे बियाणे जप्त

गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून बोगस बीटी बियाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात दाखल झाले आहे. कमी किमतीत बीटी बियाणे मिळत असल्याने आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे येत असल्याने शेतकरी त्याला बळी पडत आहेत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, (प्रतिनिधी)

नागपूर, 19 जून- बोगस बीटी बियाणांचा सुळसुळात जिल्ह्यात झाला आहे. सुमारे एक कोटीचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. बोगस बीटी बियाणांवरील बोंड अळीवर घातक किटकनाशक फवारताना आतापर्यंत विदर्भात 60 शेतकरी दगावले आहेत, तर 1200 च्यावर शेतकरी जखमी झाले आहेत. यावरून शेतकऱ्यांनो मरायला तयार रहा हा संदेश का? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेली दोन वर्षे राज्यात बोगस बीटी बियाणांमुळे आलेल्या बोंडअळीने अर्धेअधिक कापूस उत्पादन फस्त केले होते. पण असे असताना राज्यात पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बीटी बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या राज्यात दाखल झाल्या आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात कृषी विभागाकडून एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त बोगस बीटी बियाणे जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून बोगस बीटी बियाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात दाखल झाले आहे. कमी किमतीत बीटी बियाणे मिळत असल्याने आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे येत असल्याने शेतकरी त्याला बळी पडत आहेत. कृषी विभागातर्फे बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचे बियाणे जप्त केहे आहे.

बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चालत आहे. काही कृषी केंद्र संचालकांना गाठून अवास्तव कमिशनचे आमिष देऊन त्यांना विक्रीचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात येते.

कुही तालुक्यातील आंभोरा, पचखेडी, मांढळ, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि नागपुरातील मौदा, रामटेकच्या आदिवासीबहुल भागात

मध्य प्रदेशची सीमा असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा, केळवद भागातही या बोगस बियाणे विक्रीचे प्रकार वाढले आहेत. बोंड अळीसारखा प्रकोप होऊ नये, कुठलेही घातक किटकनाशक शेतकऱ्यांना वारपरावे लागू नये, यासाठी भारतात बीटी कापसाच्या बियाणांना परवानगी देण्यात आली होती. पण आता बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकरी फसवला जाऊ लागला आहे. पण हे बियाणे गुजरातच्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तयार केले जातात त्यांच्यावरच कारवाई का करत नाही असा सवाल शेतकरी नेते विचारताहेत.

बीटी काँटन, एचटीबीटी, चोर बीटी, हर्बीसाईट टोलरंट हे सर्व एकच आहे. याला परवनागनी नाही. माँन्सँटो कंपनीकडे याचा जीन नाही. तो वेगळ्या कंपनीकडे आहे. मुळात केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मग पंतप्रधानांच्या गुजरातमधील हजारो शेतकऱ्यांच्या शेतात या बोगस बीटी बियाणे तयार होतात. त्यांना का पकडत नाही, असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

बोगस बियाण्यांची विक्री दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत असताना त्यावर नियंत्रण ठेवणारी सरकारी यंत्रणाच अपुरी आहे. कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन केले जातात. पण त्यातही कर्मचाऱ्यांची मर्यादा आहे. तपासासाठी वाहने नाहीत तर पोलीससारख्या यंत्रणेचे सहकार्य नाही. कृषी केंद्राच्या संचालकांना मिळणाऱ्या कमिशनमुळे, धाडी टाकूनही सोर्स उघडे करीत नाही. त्यामुळे दरवर्षी बोगस बियाण्यांची खरेदी करून शेतकरी फसविले जात आहे.

आम्ही सीमेवरील केळवद आण इतर भागातून एक कोटी किमतीचे बियाणे जप्त केले आहे. मुळात या बोगस बिटी बियांणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, पर्यांवऱणाचेही नुकसान होते. मानवी आरोग्यासही अशा बीटी बियाणांच्या आणि त्याच्यावरील किटकनाशकांच्या संपर्कात आल्यास कँसर सारखे रोग होऊ शकतात. केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. भरारी पथके तैनात आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक अधिकारी संदीप पवार यांनी दिली.

-शेतकऱ्यांना फसविण्यासाठी बोगस बियाण्यांच्या कंपन्या सक्रिय.

-कृषी विभागाच्या भरारी पथकाने नागपुर जिल्ह्यात जप्त केले 1 कोटींचे बोगस बियाणे.

-रेल्वे, ट्रँव्हल्स आणि कुरियर कंपन्यांच्या माध्यमातून बियाणे राज्यात दाखल.

खरं तर कपाशीवर बोंड अळी येऊ नये, यासाठी शेतकरी बीटी बियाणे वापरू लागले आहेत. पण बोगस बीटी बियाणांवरील बोंड अळीवर घातक किटकनाशक फवारतांना आतापर्यंत विदर्भात 60 शेतकरी दगावले आहेत तर 1200 च्या वर जखमी झाले आहेत. पण अस असतांनाही बोगस बीटी बियाणांचा सुळसुळात झाल्याने शेतकऱ्यांनो या वर्षीही मरायला तयार रहा असा संदेश तर सरकार देत नाहीना, असा प्रश्न पडला आहे.

First published: June 19, 2019, 11:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading