मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेमी युगुलाला मारहाण करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, इतरांचा शोध सुरू

प्रेमी युगुलाला मारहाण करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, इतरांचा शोध सुरू

 कायदा हातात घेण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

कायदा हातात घेण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

कायदा हातात घेण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

  • Published by:  Meenal Gangurde

जालना, 31 जानेवारी : जालना जिल्ह्यातील प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत काही तरुणांकडून प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केली जात होती. या तरुणांवर मुलीच्या विनयभंगाचा आरोप आहे. या व्हिडिओत युगुलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली जात आहे. हे प्रेमीयुगूल बुलढाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात या व्हिडिओचा तीव्र प्रतिसाद उमटला आहे. कायदा हातात घेण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर जालन्यातील पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. कृष्णा वाघ असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस अधिक्षक एस चैतन्य व अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार,  उपविभागीय पोलिस अधिकारी खिरडकर स्वतः तालुका जालना पोलीस ठाण्यात बसून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीची चौकशी करीत आहेत. याप्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपींच्या तपासासाठी वेगवेगळे पथकं तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

पोलीस याबाबत निष्काळजी राहिले आहे. त्यांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभं राहते. सरकार कोणतेही असले तरी अशा घटनांवर सर्वांनी मिळून काम करायला हवे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षतेने प्रवीण दरेकांनी म्हटले आहे. कायदा सुव्यवस्था नीट राखली नाही तर मुलींना घराबाहेर पडणं अवघड होईल. समाजाची अशी संकुचित मानसिकता बदलायला हवी, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येत आहे.

First published:

Tags: Jalna