लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटीत, विधवा महिलांना अडकवायचा प्रेमाच्या जाळ्यात

लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटीत, विधवा महिलांना अडकवायचा प्रेमाच्या जाळ्यात

घटस्फोटीत महिलांचा शोध घेण्यासाठी त्याने जीवनसाथी डॉट कॉम तसेच मॅट्रोमोनी डॉट कॉम या विवाह विषयक वेबसाइटचा आधार घेतला.

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,7 डिसेंबर: लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटीत आणी विधवा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणारा 'लखोबा लोखंडे'स जेरबंद करण्यात नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकास यश आलं आहे. असून राज्याच्या विविध भागातील 19 महिलांना, विशेषतः घटस्फोटीत महिलांना गंडवणारा संपत चांगदेव दरवडे ऊर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील याच्या नाशिकमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या आहे.

मिळलेली माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिस ठाण्यात सप्टेंबर महिन्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित महिलेस लग्नाचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये येत असल्याचं संबधित महिलेच्या भावाने नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेस माहिती दिली. पोलिसांनी गंभीर दखल घेत सूत्रे फिरवली.

शहराच्या पंचवटी भागातील हॉटेल मानसमध्ये एका महिलेला फसवणुकीच्या तयारीत असलेल्या संपतभोवती पोलिसांनी सापळा रचला. छत्रपती सेनेच्या स्थानिक कार्यकर्ते तुषार गवळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोलिसांना साथ दिली. या लखोबाला रंगेहाथ पकडण्यात यश आले.

विविध नावे धारण करून या लखोबाने महिलांची फसवणूक करत होता. 2014 मध्ये त्याने आरती नामक महिलेशी विवाह केला. त्यांना एक आपत्यही झाले. मात्र ते प्रीमॅच्युअर असल्याने काही महिन्यातच दगावले. त्यानंतर संशयिताने पुण्यात राहणाऱ्या मूळ नागपूरमधील महिलेशी जवळीक साधून तिला लग्नाचं आमिष दाखवत 50 हजार उकळले. त्यांनतर त्याने घटस्फोटीत महिलांचा शोध घेण्यासाठी त्याने जीवनसाथी डॉट कॉम तसेच मॅट्रोमोनी डॉट कॉम या विवाह विषयक वेबसाइटचा आधार घेतला. विधवा महिलांना मुलांच्या संगोपनाचे आमिष दाखवून याद्वारे तो महिलांना जाळ्यात ओढायचा. यातील काही महिलांच्या असहाय्यतेचा त्याने गैरफायदाही घेतला. या लखोबाने नागपूर, अमरावती, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, इंदूरमधील 19 महिलांना गंडवलं आहे. अखेर या सर्व पीडित महिला एकत्र आल्या. त्यांनी 'स्वीट लेडी विथ वन एम' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमधील नाशिकच्या महिलेकडून आर्थिक लाभ उकळण्यासाठी तो नाशिकमध्ये येणार असल्याचे समजताच या महिला नाशिकमध्ये आल्या आणि भामट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 7, 2019, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading