मुंबई, 26 जून- पाण्याच्या टबमध्ये बुडून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमधील चंदनसार कोपरी गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, नित्यानंद अपार्टमेंट रूम नं 204 मध्ये जयश्री भरत सोनावणे या त्यांची मुलगी अवनी हिला घरातच ठेवून कचरा टाकण्यासाठी बिल्डिंगच्या खाली गेल्या होत्या. अवनी खेळत खेळत बाथरूममध्ये गेली. पाण्याने भरलेल्या टबमध्ये ती पडला असता तिचा बुडून मृत्यू झाला. जयश्री सोनावणे या घरी आल्यानंतर त्यांना अवनी पाण्याच्या टबमध्ये पडलेली दिसली. त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता त्यांनी अवनीला विरारच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे नेले असता डॉक्टरांनी अवनीला मृत घोषित केले. अवनीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावधान! गाडीवर 'पोलीस' लिहिता येणार नाही
मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे. अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावलेली असते. मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळेल.
न्यायाधीशांसाठीही नियम
न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश' असं लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढलं आहे. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. याचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं