महात्मा फुले पतसंस्थेत दीड कोटींचा अपहार, अध्यक्षासह 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा

महात्मा फुले पतसंस्थेत दीड कोटींचा अपहार, अध्यक्षासह 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा

चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे दीड कोटी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक , रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक अशा चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

  • Share this:

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 17 जुलै-चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे दीड कोटी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अध्यक्ष, मुख्य शाखा व्यवस्थापक , रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक अशा चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले आहेत. दीड कोटींचा हा घोटाळा नसून चौकशीत या घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ठेवीदारांचे पैसे अद्यापही मिळत नसल्याने ठेवीदार चिंतेत सापडले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी 12 वर्षांपूर्वी 11 संचालकांना सोबत घेऊन चिखली शहरात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली होती. मात्र, पतसंस्था सुरु झाल्यापासूनच ती आर्थिक अडचणीत सापडली आणि तेव्हापासून ठेवीदारांचे पैसे असुरक्षित झाले. राजकीय वजन असल्याने आणि संचालक मडंळी सुद्धा राजकारणाशी निगडित असल्याने पतसंस्था चालूच ठेवली. आता जवळपास या तसंस्थेच्या 12 वर्षांचा कालावधी उलटला मागील 2 वर्षांपासून पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणखीच बिघडली. चिखली तालुक्यातील अनेक लोकांच्या 6 कोटींच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे मुदत संपूनही मिळणासे झाले आहे. ठेवीदार बँकेत चकरा मारून थकले आहेत. अध्यक्षांच्या घरी सुद्धा जाऊन थकले, शिवाय सहाय्यक  निबंधक, जिल्हा सहकारी  निबंधक यांच्याकडे अनेकदा तक्रारी करून झाल्या. मात्र पैसे काही मिळत नाहीत. फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात. यात कोणाचे 10 लाख रुपये तर कोणाचे 18 लाख रुपये अडकले आहेत. मुलीचे लग्न, मुलांच्या शिक्षणाचे, नातवाचे शिक्षणाचे, वृद्धांचे पैसे अडकले असून आता काय करायचे, असा प्रश्न ठेवीदारांसमोर उभा राहिला आहे. पतसंस्थेत पै-पै जमा करून ठेवलेले पैसे मिळत नसल्याने शेवटी ठेवीदारांनी जिल्हा सहकारी निबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांनीच घेतले कर्ज..

ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनुसार सहकार विभागाने या पतसंस्थेचे मागील 2 वर्षांचे ऑडिट केले असता त्यात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. बँकेने कर्ज वाटप करताना कोणतेही तारण घेतलेले नाही. अध्यक्ष आणि संचालकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर पैसे काढल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्यांनी सुद्धा पैसे परस्पर पैसे काढल्याचे दिसून आले. शिवाय खर्च ही अवास्तव करण्यात आला आहे. जवळपास मागील 2 वर्षांत  1 कोटी 47 लाख 20 हजार 329 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. अनेक लोकांचे पैसे या बँकेत अडकले असून काही ठेवीदार अद्यापही समोर आलेले नाही. या बँकेचे संपूर्ण ठेवीदार समोर आल्यास हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑडिटमध्ये या सर्व बाबीसमोर आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. बँकेचे अध्यक्ष दत्ता खरात, मुख्य शाखा व्यवस्थापक सतीश वाघ, रोखपाल परमेश्वर पवार आणि शाखा व्यवस्थापक गणेश खंडागळे यांच्यावर दीड कोटींचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भादंवि कलम 420, 409, 406, 468, 470, 471, 477-अ, 34 तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण ) अधिनियम 1999 नुसार कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे ठाणेअंमलदार गुलाबराव वाघ यांनी माहिती दिली आहे.

पतसंस्थेत पैसे अडकल्याने अनेक ठेवीदारांचे संसार रस्त्यावर आले आहे. अध्यक्षासह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, मात्र बँकेत इतरही संचालक मडंळी असून ते सुद्धा या अपहारास तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई करा, त्यांची संपत्ती जप्त करून लोकांच्या पैसे परत द्यावे, अशी मागणी कविता पाटील, विजय सवडतकर या ठेवीदारांनी केली आहे. एकूणात महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतरही बँकेत असलेले ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्पित करण्यात आला आहे.

VIDEO:भयंकरच! माजी आमदाराच्या पाण्याच्या बाटलीत आढळली पाल

First published: July 17, 2019, 9:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading