मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'एक का डबल' करण्याच्या नादात लागला दीड कोटींचा चुना, भिवंडीतील व्यावसायिकासोबत घडला विचित्र प्रकार

'एक का डबल' करण्याच्या नादात लागला दीड कोटींचा चुना, भिवंडीतील व्यावसायिकासोबत घडला विचित्र प्रकार

Crime in Thane: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील एका बँक व्यवस्थापकानं एका व्यावसायिकाची तब्बल दीड कोटींची फसवणूक (one and half crore fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    भिवंडी, 21 फेब्रुवारी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील एका बँक व्यवस्थापकानं एका व्यावसायिकाची तब्बल दीड कोटींची फसवणूक (one and half crore fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमा कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा (lure of double profit) मिळेल, असं आमिष दाखवून आरोपीनं व्यावसायिकाला गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. पण आरोपीनं गुंतवणूक केल्याची काही कागदपत्रं व्यावसायिकाला दिली नव्हती. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकानं भिवंडी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून पुढील तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक हे भिवंडी येथील रहिवासी असून त्यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. संबंधित व्यावसायिकाने 2012 साली एका सरकारी बँकेतून 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. दरम्यान त्यांची ओळख बँकेच्या व्यवस्थापकाशी झाली होती. याच ओळखीतून आरोपी व्यवस्थापकाने फिर्यादीला दुप्पट परताव्याचं आमिष दाखवलं होतं. आपली पत्नी एका विमा कंपनीत काम करते, संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास 9 वर्षांनी दुप्पट परतावा मिळेलं असं आरोपीनं व्यावसायिकाला सांगितलं होतं. हेही वाचा-चुकीच्या डोसची बळी ठरली 2 महिन्यांची चिमुकली, मृत्यूनंतर गावात हळहळ त्याप्रमाणे फिर्यादी व्यावसायिकानं आपल्या पत्नीच्या नावानं 99 लाख 99 हजार 778 रुपये संबंधित विमा कंपनीत गुंतवले होते. पण आरोपी बँक व्यवस्थापकानं या योजनेतील काही कागदपत्रे व्यावसायिकाला दिली नव्हती. काही वर्षांनी व्यावसायिकाने विमा कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली. यावेळी काही जणांनी बनावट स्वाक्षऱ्या करून कर्ज मंजूर केल्याची बाब समोर आली. आपली फसणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हेही वाचा-घातपाताचा डाव उधळला; गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणारी टोळी जेरबंद गुंतवणूक केलेले 99 लाख 99 हजार 778 रुपये आणि त्याचा परतावा असे एकूण 1 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी बँक अधिकारी आणि विमा क्षेत्रातील अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhiwandi, Crime news, Financial fraud

    पुढील बातम्या