मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्वतः शेणात बरबटलेले अन् दुसऱ्यावर शेण्या..; करमुसे प्रकरणावरून शिवसेनेनं पुन्हा आव्हाडांना डिवचलं

स्वतः शेणात बरबटलेले अन् दुसऱ्यावर शेण्या..; करमुसे प्रकरणावरून शिवसेनेनं पुन्हा आव्हाडांना डिवचलं

शिंदे गटाने पुन्हा आव्हाडांना डिवचलं

शिंदे गटाने पुन्हा आव्हाडांना डिवचलं

शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च : शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एक कविता ट्विट करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी अनंत करमुसे या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. यावरून आव्हाडांवर आरोप करण्यात आले होते. हाच मुद्दा पकडत नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.   'समज देणे आणि संपवणे यात फरक असतो का आव्हाड? माणसाला संपवण्याचं समर्थन करायचं का' असा सवाल मस्के यांनी ट्विटरवर केला.

नेमकं काय म्हटलं मस्के यांनी? 

'समज देणे आणि संपवणे यात फरक असतो का आव्हाड?

माणसाला संपवण्याचं समर्थन करायचं का

@Awhadspeaks

आव्हाड?

शाहू फुले आंबेडकरांचे

हेच आहेत का संस्कार?

#अमानुष मारहाण आणि

जीवघेणे प्रहार?

आमची चिंता करू नका

आमचे शिवरायांचे #संस्कार आहेत

अधर्म पसरवणाऱ्यांना

जागा दाखवण्याचे #विचार आहेत..

वारसा सांगायचा एक आणि हरकती औरंगी करायच्या

स्वतः शेणात बरबटलेले

दुसऱ्यावर शेण्या फेकायच्या..'

असा जोरदार प्रहार नरेश म्हस्के यांनी ट्विटरवर कविता पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

घोडबंदर येथील कावेसर येथे राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरून नरेश म्हस्के यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे.

First published:
top videos