हिरवी घाटे अळी संपवणार हरभऱ्याचं पिक; ढगाळ वातावरणाचा परिणाम

हिरवी घाटे अळी संपवणार हरभऱ्याचं पिक; ढगाळ वातावरणाचा परिणाम

सततच्या ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ परिसरामधील हरभरा पिकावर पानं खाणाऱ्या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झालाय.

  • Share this:

हिंगोली, 12 डिसेंबर : सततच्या ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ परिसरामधील हरभरा पिकावर पानं खाणाऱ्या हिरव्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळं शेतकरी संकटात सापडलाय. अनेक कीडनाशकांचे फवारे करुनही हरभऱ्यावरील अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

यावर्षी हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कस बस शेतकऱ्यांनी रब्बी मध्ये हरभरा ची पेरणी केली . पण आता हरभरा तुरीवर सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा च्या पिकावर आळी चा प्रादुर्भाव झाला आहे . रब्बी हंगामात औढा परिसरातील औंढा नागनाथ,वगरवाडी, पिंपळदरी,माथा,वाळकी, तळणी, सुरेगाव, अंजनवाडा, येळेगाव,सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हरभऱ्याची पेरणी करण्यात आलेली आहे.

यावर्षी परतीचा पाऊस गायब झाल्याने या भागातील रब्बीची पेरणी उशिरा झाली आहे. तसेच औढा तलाव. सिद्धेश्वर धरणातून पाणी पाळी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. परंतु थंडी नसल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच वारंवार ढगाळ वातावरण राहत असल्याने ऐन फुले धरण्याच्या अवस्थेत हरभऱ्यावर पाने खाणाऱ्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी अजूनही कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडुन मात्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जात नाही.

शेतकऱ्यांना अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परंतु कर्मचारी महिनोंमहिने ग्रामीण भागात फिरकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकरी कृषी विक्रेत्यांने दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करीत आहेत. वातावरणातील बदलामुळे फवारणी केलेल्या औषधाचा परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे टाकले आहे.

याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी घाटे आळीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे . यामध्ये पक्षी थांबे बसवून नैसर्गिक रित्या उपाय करता येतील याशिवाय औषध फवारणी ची माहिती दिली . कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याची प्रतिक्रिया कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली .

दुष्काळी परिस्थिती असतानाही धडपड करून जोपासलेल्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

 VIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले

First published: December 13, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading