मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येला 13 दिवस पूर्ण होताच पती गौतम यांचा मुलासह आनंदवनाला निरोप

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येला 13 दिवस पूर्ण होताच पती गौतम यांचा मुलासह आनंदवनाला निरोप

"आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय"

"आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय"

"आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय"

  • Published by:  Meenal Gangurde
चंद्रपूर, 16 डिसेंबर : आनंदवानातील कारभार पाहणाऱ्या डॉ. शीतल आमटे (Dr. Shital Amte Suicide) यांच्या आत्महत्येमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान शीतल यांच्या आत्महत्येला 13 दिवस पूर्ण होताच त्यांचे पती गौतम करजगी (Gautam Karjagi) आणि 6 वर्षांचा मुलगा शर्विल यांनी आनंदवनाचा निरोप घेतला आहे. दोघेही पुण्याला रवाना झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. रविवारी शीतल आमटे यांच्या मेडिकल कॉलेजच्या मित्र मंडळींनी आणि काही जवळील व्यक्तींनी आनंदवनात शोकसभा घेतली होती. शीतल आमटेंच्या मृत्यूला 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही शोकसभा घेण्यात आली होती. यावेळी आमटे कुटुंबातील एक व्यक्ती उपस्थित नव्हती. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. दुसरीकडे काही काळ आनंदवनातून दूर असणारे कौस्तुभ आता इथल्या कामात परतले आहेत. त्यामुळे यामध्ये शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांची काय भूमिका असेल याबाबत संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे. "आता आमची गरज आहे का? हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचंय" अशी भूमिका गौतम करजगी यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. कुष्ठ रोगांच्या जखमेवर फुंकर घालणारे ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांनी आनंदवनात आत्महत्या केल्याची मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. शीतल आमटे यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, 'आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण धक्क्यामध्ये आहोत. डॉ.शीतल आमटे यांनी सोमवारी सकाळी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी! मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह करून आनंदवनातील महारोजी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या