मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकीकडे ट्रक पेटला होता आणि गावकरी गव्हाची पोती पळवून नेत होती, पाहा हा VIDEO

एकीकडे ट्रक पेटला होता आणि गावकरी गव्हाची पोती पळवून नेत होती, पाहा हा VIDEO

 गावकऱ्यांनी मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लिनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला

गावकऱ्यांनी मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लिनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला

गावकऱ्यांनी मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लिनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला

  इम्तियाज अली, प्रतिनिधी भुसावळ, 15 मार्च :  मध्यप्रदेशातून औरंगाबादकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यानं यात गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे, ट्रकला आग लागली असतानाही गावकऱ्यांनी गव्हाची पोती पळवून नेली. ही घटना  भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा  येथे शनिवारी पहाटे साडेतीच्या सुमारास घडली. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील प्रधान या गावातून गहू भरुन तो औरंगाबाद मधील अंजली गावात ट्रकद्वारे वाहतूक करीत असताना, ट्रक भुसावळ ते जामनेर दरम्यान, असलेल्या  भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा  येथे आला असता, अचानक ट्रकचे स्टार्टर गरम होऊन जळाल्याचा वास येऊ लागला. यावेळी चालकाच्या सांगण्यावरून क्लिनरने पाहिले असता याला आग लागल्याचं दिसून आलं. यावेळी सोबत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतील पाणी यावर टाकले असता आग आणखीच भडकली. तर परिसरातील काही नागरिकांनी येऊन माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीच भडका घेतला. ही वार्ता शेजारील गावात पोहचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मदत करण्याऐवजी ट्रकमधील क्लिनरला मारहाण करुन गव्हाची पोते घेऊन पोबारा केला. चुकून स्पीड वाढला आणि तरुणीकडून घडला भयंकर स्टंट! सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जातात. त्यात अनेकदा गंमतीदार घटना कैद होतात. आता एका मुलीने घराच्या गेटवर गाडी चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे समजलेलं नसलं तरी अपघाताने गाडीचं स्पीड वाढून स्कूटी स्पीडने पुढे जात असल्याचं यात दिसतं. याआधी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तरुणी मंदिराच्या दारात स्कुटी घेऊन उभा दिसते. ती स्कूटी स्टार्ट करताच स्पीड अचानक वाढून थेट मंदिरातच गाडी शिरल्याचं दिसतं. अशाच पद्धतीनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये गेटसमोर असलेली गाडी सुरु करताच स्पीडने पुढे गेली. व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे माहिती नसल्यानं याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Social media, Viral, Viral photos

  पुढील बातम्या