नाणार आॅईल रिफायनरीवरून राणे-शिवसेनेत जुंपली

नाणार आॅईल रिफायनरीवरून राणे-शिवसेनेत जुंपली

कोकणात होऊ घातलेल्या ऑईल रिफायनरीवरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जोरदार जुंपलीय . रिफानरीबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेची नारायण राणे सभा घेऊन पोलखोल करणार आहेत.

  • Share this:

दिनेश केळुसकर, रत्नागिरी, 03 जानेवारी : कोकणात होऊ घातलेल्या ऑईल रिफायनरीवरून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जोरदार जुंपलीय . रिफानरीबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेची नारायण राणे सभा घेऊन पोलखोल करणार आहेत. राणे आणि शिवसेनेचा हा सामना भाजपाच्या पथ्यावरच पडणारा ठरतोय .

रत्नागिरीतल्या नाणार ऑईल रिफायनरीवरून कोकणातलं राजकारण चांगलंच तापलंय. नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा सामना या निमित्तानं सुरू झालाय. प्रकल्पाविरोधातला असंतोष लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रकल्पाविरोधातच ठराव केला.

शिवसेना दुटप्पी असून चौदा गावात शिवसेनेचे दलाल सक्रीय असल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय. नारायण राणे 8 फेब्रुवारीला सभा घेऊन शिवसेनेची पोलखोल करणार असल्याचा इशाराच त्यांनी दिलाय.

शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी राणेनी बंदूक ठेवलीय ती शिवसेनेचेच बंडखोर आणि रिफयनरीविरोधी कृती समितिचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या खांद्यावर. त्यामुळे शिवसेनेची गोची झालीय.

शिवसेना आणि राणेंची झुंज सुरू असताना भाजप मात्र शांतपणं दोघांची गंमत बघत बसलीय. आणि यात विश्वासहर्ता पणाला लागलीय ती शिवसेनेची.

First published: February 3, 2018, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading