मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak mete : मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीला निघाले होते मेटे, पण वाटेतच घातला काळाने घाला!

Vinayak mete : मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीला निघाले होते मेटे, पण वाटेतच घातला काळाने घाला!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते

  • Published by:  sachin Salve
पनवेल, 14 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे मुंबईला निघाले होते. (Vinayak Mete passed away) मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते, उपचारदरम्यान विनायक मेटे (vinayak mete) यांनी अखेरचा श्वास घेतला. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले. त्यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. पण उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अधिक माहितीनुसार, खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये त्यांना तातडीने दाखल केले होते. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे अपघात झाला. या  अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. अपघातग्रस्त गाडीला डाव्या बाजूला जास्त क्षती पोहोचली आहे. अपघाताची माहिती समजतात, देवदूत रेस्क्यू यंत्रणा,अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं अकाली निधन झालं. तर त्यांच्या अंगरक्षक याच्यावर पनवेलच्या MGM रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
First published:

पुढील बातम्या