Home /News /maharashtra /

Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Omicron Variant चा कहर, राज्यात 13 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना व्हायरसचा (corona virus) नवा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर (omicron variant) लढा देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेला कोरोना व्हायरसचा (corona virus) नवा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर (omicron variant) लढा देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे. तसंच 13 देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं ठरवलेल्या निकशाप्रमाणे 13 देशांची वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. या देशांमधून ओमिक्रॉनच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जातं आहे. दरम्यान या 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर राज्य सरकार विशेष लक्ष ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. हेही वाचा- Cooking Oil : तुम्हीही खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा वापरता? आरोग्यावर होतात हे घातक परिणाम या 13 रिस्की देशातून आलेल्या प्रवाश्यांची विमानतळावरच RTPCR टेस्ट करून त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच परत आठ दिवसांनंतर देखील पुन्हा टेस्ट करूनच त्यांना सोडलं जाणार असल्याचंही राजेश टोपे म्हणालेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या 13 देशातून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना देखील 48 तासांच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र अवश्यक असणार आहे. तब्बल दोन तास बैठक शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य विभागाच अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि टास्क फोर्स यांची तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीत ओमिक्रॉन या व्हेरिएंटबाबत चर्चा झाली असून टास्क फोर्सनं बैठकीत या व्हेरिएंटबाबत सविस्तर माहिती दिली. तसंच त्यासंदर्भात धोके काय असून त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात हे सुद्धा सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बोलावली तातडीची बैठक आज मंत्रिमंडळाची (cabinet meeting) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. हेही वाचा- 'तू सोबत असतेस तेव्हा..' विराटनं अनुष्काबरोबरचा शेअर केला खास Photo, पत्नीनं दिलं मजेशीर उत्तर  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशीही चर्चा करणार आहेत. याव्यतिरिक्त देशाबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबतची नियमावलीही आज बैठकीत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा राज्य सरकारने यंत्रणेला तातडीने सज्ज राहण्याची सूचना केली आहे. 'कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन (lockdown) नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील' असं स्पष्ट केलं आहे. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला दिले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra News, Mumbai

    पुढील बातम्या