Home /News /maharashtra /

Omicron update : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेले ते 7 जण सापडले, 5 जणांची घेतली चाचणी

Omicron update : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेले ते 7 जण सापडले, 5 जणांची घेतली चाचणी

  दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 7 जणांचा शोध घेण्यात ठाणे महापालिकेला यश आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 7 जणांचा शोध घेण्यात ठाणे महापालिकेला यश आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 7 जणांचा शोध घेण्यात ठाणे महापालिकेला यश आले आहे.

    ठाणे, 30 नोव्हेंबर : कोरोनाचा  (Corona Virus) नवीन घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron Variant)  जगभरात खळबळ उडाली आहे. ठाण्यामध्ये (thane) दक्षिण आफ्रिकेवरून (south africa) आलेले सात जण आले असल्याची माहिती समोर आली. अखेर ठाणे पालिकेनं या 7 ही जणांना शोधून काढले आहे. या 7 जणांपैकी 5 जणांचा कोरोना चाचणी घेण्यात आली असून रिपोर्ट संध्याकाळी येणार आहे. सातही जण सापडल्यामुळे ठाणे पालिकेनं (thane municipal corporation)  सुटकेचा श्वास सोडला आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीमध्ये आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची  घटना ताजी असतानाच ठाण्यात सुद्धा दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली होती. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ठाणे पालिकेनं या सातही जणांचा शोध सुरू केला होता, अखेरीस हे सातही जण सापडले आहे.  दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 7 जणांचा शोध घेण्यात ठाणे महापालिकेला यश आले आहे. 7 ही जणांची मुंबई विमानतळावर rtpc चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते.  ७ पैकी २ जणांना १४ दिवसांहून अधिक दिवस झाल्याने त्या दोघांचा धोका टळला आहे. तर ५ जणांची कोरोना चाचणी केली असून आज संध्याकाळी त्यांचा अहवाल समोर येणार आहे.  ठाणे महापालिकेने या ५ जणांना एका विशेष ठिकाणी क्वारंटाइन  केले आहे. आज येणाऱ्या ५ जणांच्या अहवालाकडे पालिकेचं लक्ष लागलं आहे. आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान,Reliance JioMart घरोघरी सुविधा देणार दरम्यान, भारतात कोरोनाची लाट एकीकडे ओसरत असताना दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे. EXCLUSIVE: ओमायक्रॉनचा धोका असतानाच Gavi च्या प्रमुखांनी व्यक्त केली 'ही' चिंता राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दक्षता घेण्यासाठी विदेशातुन येणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती डॉ.शर्मा यांनी दिली. या सात प्रवाश्यांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली असून ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या