नवी मुंबई, 07 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. मुंबईमध्ये (mumbai) दोन रुग्ण सापडल्यानंतर आता नवी मुंबईमध्ये (navi mumbai) सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केल्याची शक्यता आहे. परदेशातून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या दोन्ही प्रवाशांचे जिनोम सिक्वेन्सिंग NIV कडे पाठवले असून संध्याकाळी रिपोर्ट येणार आहे.
नवी मुंबईमध्ये राहणारे दोघे जण परदेशातून आले होते. आई आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 27 नोव्हेंबरला इंग्लंडहुन नवी मुंबईत आले होते. मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी घेण्यात आली होती, तेव्हा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. मात्र, 7 दिवसांनी महापालिकेने केलेल्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे या दोघांचे जिनोम सिक्वेन्सिंग NIV कडे पाठवण्यात आले आहेत. आज संध्याकाळपर्यंत जिनोम सिक्वेन्सिंगचे रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) शिरकाव केला आहे. मुंबईमध्ये २ रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यात एकूण रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. जोहान्सबर्गहून मुंबईला आलेल्या 37 वर्षीय तरुण 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आला होता. त्याच्यासोबत त्याची अमेरिकेतील महिला मैत्रिणही होती. तिलाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. दोघांनी फायझरची लस घेतली आहे.
Online न दिसता WhatsApp वर मेसेज करायचाय? ही आहे सोपी पद्धत
सध्या दोघांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांच्या संपर्कात आलेले 5 हायरिस्क व्यक्ती आणि 315 कमी जोखमीचे संपर्क ओळखले आहेत. तर याआधीच डोंबिवलीमध्ये ०१, पिंपरी चिंचवडमध्ये ०६, पुण्यामध्ये ०१ रुग्ण आढळून आला आहे.
ओमायक्रोन धोका
कोरोना बाधितांच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच हायरिस्क देशातून आलेले प्रवासी ओमायक्रोन बाधित आहेत की नाहीत हे स्पष्ट होईल. पण एकंदर हायरिस्क देशातून कल्याण-डोंबिवली शहरात आलेल्या नागरिकांची संख्या पाहता आणि त्यांचा कल्याण डोंबिवली शहरात झालेला वावर पाहता कल्याण-डोंबिवली शहराला ओमायक्रोन धोका वाढलेला आहे असं दिसतंय.
विवाहित उद्योजिकेला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; अश्लील VIDEO बनवून लाखोंची वसुली
या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती तात्काळ गोळा करून त्यांना स्वतंत्र क्वारनटाईन केलं जाईल अशी यंत्रणा कल्याण डोंबिवली महानगरपालिका तयार करत आहे. शिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मास्क वापरणे सक्तीचे केले असून कोणत्याही कार्यक्रमास 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास संबंधित कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दिलेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.