मोदी सरकारवर टीका करणाऱ्या उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारली

मोदी सरकारवर टीका करणाऱ्या उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारली

नाशिक, नंदुरबार पाठोपाठ जळगावमध्येही पोलिसांनी नाकारली जाहीर सभांसाठी परवानगी नाकारली आहे. CAA आणि NRC विरोधात सभेत कायदा आणी सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने यासाठी परवाणगी नाकारण्यात आली आहे.

  • Share this:

नाशिक, 07 फेब्रुवारी : संपूर्ण देशभरात CAA आणि NRC विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे. अशात महाराष्ट्रातही CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेतल्या जातात. या सभा घेणाऱ्या विद्यार्थी नेता उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

नाशिक, नंदुरबार पाठोपाठ जळगावमध्येही पोलिसांनी नाकारली जाहीर सभांसाठी परवानगी नाकारली आहे. CAA आणि NRC विरोधात सभेत कायदा आणी सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने यासाठी परवाणगी नाकारण्यात आली आहे. 7 तारखेला नाशिकच्या मालेगावला आणि नंदुरबारला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण दोन्ही जिल्ह्यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली.

तर 8 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यात 3 सभा होत्या. मात्र, जळगांव पोलिसांनीही परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. CAA आणी NRC विरोधात योगेंद्र यादव आणि उमर खालीद भडकाऊ भाषण करतात असा अहवाल यावेळी देण्यात आला. आयोजक संविधान बचाव नागरी कृती समितीला परवानगी नाकारल्याची पोलिसांनी अधिकृत नोटीस दिली आहे.

जातीय सलोखा कायम राखण्यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न या सभातून होत असल्याचा अहवालही देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत आक्रमक भाषण केलं होतं. यावेळी उमर खालीद आणि योगेंद्र यादवही या सभेला उपस्थित होते. त्यांनी या सभेत मोदी सरकारवर टीका केली होती.

विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. 'मोदी विकास पुरुष असल्याचा मुखवटा घालून फिरतात. आता ते मुस्लिम महिलांचा भाऊ असल्याचा मुखवटा घालून फिरत आहेत. भारत मोदींचा नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे,' अशी टीका केली होती.

भिवंडीतील आंदोलनात योगेंद्र यादव यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला होती. 'मोदींना सफेद टोपी आणि हिजाफ दिसते. परंतु या लाखोंच्या हातातील तिरंगा दिसत नाही हे दुर्दैव आहे. या आंदोलनातून देशातील घुसमट बाहेर आली असून खरे चित्र महिलांच्या रूपाने समोर आले आहे. शाहीनबाग येथील आंदोलनाने हे दाखवून दिले की महिलांची ताकद काय आहे . पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण या आंदोलनात असून प्रत्येक भारतीयाने त्याच भावनेतून यायला पाहिजे,' असे आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 07:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading