मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /इवली इवली पावलं जेव्हा सागराकडे धावली, कोकणातला खास VIDEO

इवली इवली पावलं जेव्हा सागराकडे धावली, कोकणातला खास VIDEO

महाराष्ट्र शासन वन विभागाकडून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची संवर्धन मोहीम कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राबविली जात आहे.

महाराष्ट्र शासन वन विभागाकडून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची संवर्धन मोहीम कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राबविली जात आहे.

महाराष्ट्र शासन वन विभागाकडून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची संवर्धन मोहीम कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राबविली जात आहे.

 शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 16 मार्च : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर (Murud beach) संरक्षित केलेल्या घरट्यातील दुर्मिळ अशा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची (olive ridley turtle) 90 पिल्लं सुखरूप समुद्रात झेपावल्याचा सुखद व्हिडीओ समोर आला आहे. तर समुद्र किनारी सापडलेल्या घरट्यातून  170 पिल्लं संवर्धित करण्यात आली असून दापोली (Dapoli) तालुक्यात 8 हजार अंडी संवर्धित करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र शासन वन विभागाकडून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची संवर्धन मोहीम कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राबविली जात आहे. कासव संवर्धन या मोहिमे अंतर्गत  रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह  रिडले समुद्री कासवांची अंडी संवर्धित केली जात आहे.

दापोली तालुक्यातील केळशी, आंजर्ले, पाडले, पालांडे, मुरुड, कर्दे, लाड़घर, कोळथरे, दाभोल या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले समुद्री  कासव दरवर्षी अंडी  संवर्धित करण्यात येत आहेत. या समुद्र किनाऱ्यावर 8 हजार अंडी संवर्धित करण्यात आली आहेत. दरवर्षी अंडी घालण्यासाठी कासव येत असतात. परंतु, या पूर्वीही अंडी जंगली प्राणी, भटकी कुत्री व स्थानिक लोकांकडून नष्ट केली जात जात होते.

पुण्यात विभागीय आयुक्तांनाही कोरोना; संसर्गाचा वेग वाढला, धक्कादायक आकडेवारी

परंतु, महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत कासव संवर्धन मोहीम राबविण्यात येत असल्याने समुद्र किनार्‍यावर आढळलेली अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये संवर्धित केली जात आहेत. संवर्धित केलेल्या अनैसर्गिक घरट्यात अंडी ठेवली जातात आणि त्यातून पिल्या तयार झाल्यावर ती पिल्लं पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. ही मोहीम गेली दहा वर्ष कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.

बुमराहला लग्नाच्या शुभेच्छा देताना मयंकची मोठी चूक, संजनाला टॅग करण्याऐवजी...

कोरोना काळातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन मोहीम मोठ्या जोमाने सुरू आहे. संवर्धित केलेल्या घरट्यातील अंड्यातून निघालेली पिल्लं सुखरूप समुद्रात सोडण्यात येत आहेत. दापोली तालुक्यातील मुरुड, कोलथरे, दाभोळ, केळशी, आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून या पूर्वी 450 पिल्लं संरक्षित केलेल्या घरट्यातून समुद्रात झेपावली आहेत.

First published:
top videos