Home /News /maharashtra /

जीवनाचा दुःखद शेवट, वृद्ध पत्नीने किचनमध्ये तर पतीने बेडरूममध्ये घेतला गळफास

जीवनाचा दुःखद शेवट, वृद्ध पत्नीने किचनमध्ये तर पतीने बेडरूममध्ये घेतला गळफास

या वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होतं आहे.

कुर्डूवाडी, 28 जानेवारी : जीवनाच्या उत्तरार्धात नवरा आणि बायको एकमेकांचे सोबती... एकमेकांना साथ देऊन जुन्या आठवणीत रमत आणि नातवांसोबत सुखी दिवस काढायचे असतात. परंतु, कुर्डूवाडी येथील एका दाम्पत्याने उत्तरार्धात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. कुर्डूवाडी येथील आंतरभारती विद्यालयाच्या नजीक राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली आहे. सुशीला नवनाथ कदम (वय ६५ ) आणि नवनाथ भगवान कदम ( वय ७५) अशी दाम्पत्यांची नावं आहेत. कौटुंबिक कलहातून नैराश्य आल्यामुळे या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचचले. सुशीला कदम यांनी राहत्या घरात वरच्या मजल्याच्या किचनमध्ये तर नवनाथ कदम यांनी बेडरूममध्ये लोखंडी अँगलला दोरीने लटकून आत्महत्या केल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे. नवनाथ कदम हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. निवृत्त होऊन त्यांना सुमारे १७ वर्षे झाले होते. नवनाथ कदम आणि सुशीला कदम या दाम्पत्यांला तीन मुले असून दोन शिक्षक आणि एक व्यावसायिक आहे. या वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होतं आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीचा निर्घृणपणे खून दरम्यान, मनमाडपासून जवळ असलेल्या दहेगाव इथं चारित्र्यवर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यानंतर स्वतःला ही वाहनाच्या खाली झोकून आत्महत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतात पडलेला मृतदेह सुनिता कडनोरचा तर रस्त्याच्या कडेला असलेला मृतदेह नितीन कडनोरचा आहे. नितीन हा पत्नी सुनितावर नेहमी संशय घेत होता. त्यातून अनेक वेळा त्यांच्यात भांडणं देखील झाली. प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं होतं. नातेवाईकांनी समजूत काढल्यामुळे प्रकरण मिटलं आणि दोघांचा संसार पुन्हा सुरू झाला. मात्र, नितीन च्या डोक्यातून संशयाचं भूत काही गेलं नव्हतं. अखेर आज सुनीता स्वतःच्या शेतात इतर महिलांसोबत कांद्याची लागवड करीत असताना नितीनने तिच्यावर हल्ला करून डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात सुनिताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला ठार केल्या नंतर  नितीनने गावातून जाणाऱ्या पुणे-इंदूर मार्गावर धाव घेऊन स्वतःला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाखाली झोकून दिलं त्यात त्याचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवलं. सुनिता आणि नितीनला एक मुलगा, 2 मुली असून नितीन हा आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याच्याकडे भरपूर बागायत शेती असल्याने एका प्रकारे तो कोट्यधीश मानला जात होता. मात्र, संशयाचं भूत डोक्यात घरं करून राहिल्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय.
Published by:sachin Salve
First published:

Tags: #husband, Crime, Crime news, Pandharpur, Pandharpur news

पुढील बातम्या