रस्ता ओलांडत होती महिला..अंगावरून गेली भरधाव बस, मेंदूचा झाला चेंदामेंदा

रस्ता ओलांडत होती महिला..अंगावरून गेली भरधाव बस, मेंदूचा झाला चेंदामेंदा

दापोलीत एसटी बसच्या धडकेने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील पालगड धोंडीदुकानजवळ हा अपघात झाला. आजर्ले-मुंबई या बसने रस्ता ओलांडणाऱ्या गंगुबाई गंगाराम चव्हाण (वय-60, रा. पालगड कोर्टिवाडी) यांना जोरदार धडक दिली. त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

  • Share this:

रत्नागिरी, 13 मे- दापोलीत एसटी बसच्या धडकेने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील पालगड धोंडीदुकानजवळ हा अपघात झाला. आजर्ले-मुंबई या बसने रस्ता ओलांडणाऱ्या गंगुबाई गंगाराम चव्हाण (वय-60, रा. पालगड कोर्टिवाडी) यांना जोरदार धडक दिली. त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव बसची धडक बसताच गंगुबाई 20 फूट अंतरावर फेकल्या गेल्या. बसचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेले. महिलेच्या मेेदूचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. बस पुढे जाऊन 60 फूट अंतरावर थांबली. एसटी चालक घटनास्थळावरुन फरार झाला. घटनास्थळी पोलीस व एसटी अधिकाऱ्यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला.

एक तासात एसटी चालकाला पकडा, अन्यथा...

महिनाभरात या ठिकाणी चार अपघात झाले आहेत. आज झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागही तितकाच जबाबदार आहे. या मार्गावरुन गाड्या सुसाट धावतात. अपघातात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. फरार एसटी चालकाला एक तासात पकडा,अन्यथा महिलेचा मृतदेह रस्त्यावरुन उचलू देणार नाही, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

मृत महिलेच्या वारसाला तत्काळ मदत...

एसटी आगाराकडून मृत महिलेच्या वारसाला तत्काळ 10 हजार व अपघातनिधी अंतर्गत महामंडळाच्या नियमानुसार संबंधित नातेवाईकाचा P फॉर्म भरुन घेण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक पी. बी. धायतोडे यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस दीपक गोरे, विलास पवार, मोहन पाटील, एस एम शेळके करत आहेत.

कोकणातील रस्ते बनले मृत्युचा सापळा

कोकणातील रस्ते मृत्युचा सापळा बनत चालले आहेत. वाहन चालकाच्या निष्काळजी पणामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. दापोली, मंडणगड तसेच मुंबई महामार्ग याला अपवाद नाहीत. दापोली ते मंडणगड या मार्गावर पालगाड या ठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत.  वळणावळणाचे रस्ते आहेत, या रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु वाहनचालक मात्र पादचाऱ्याचा विचारच करत नाहीत. याचाच प्रत्यय आज पाहायला मिळाला. बस चालकांच्या निष्काळजी पणामुळे निष्पाप वयोवृद्ध आजीचा मृत्यू झाला.  एसटी बस भरधाव होती आजीची कोणतीही चूक नसताना तिला प्राण गमवावा लागला.

VIDEO : राज ठाकरेंनी मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला

First published: May 13, 2019, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading