वयाच्या 80 वर्षी पत्नीसह बळीराजाची दुबार पेरणी, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

वयाच्या 80 वर्षी पत्नीसह बळीराजाची दुबार पेरणी, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

मुलबाळ नसल्यामुळे नरहरी ढेकणे आणि त्यांची पत्नी सोजर ढेकणे यांना वयाच्या 80 व्या वर्षीही संसाराचा गाडा स्वत:लाच ओढावा लागत आहे.

  • Share this:

सोलापूर, 06 जुलै :  काबाड कष्ट करून, शेतात घाम गाळून,  बळीराजा काळ्या मातीतून सोनं पिकवतो. तुमच्या आमच्यासाठी बळीराजा हा अन्नदाताच.   पण, वयाच्या 80 व्या वर्षीही हा बळीराजा आपल्या मातीशी घट्ट ठेवून आहे, या वयातही काळ्या मातीतून आपल्या कारभारणीसोबत उभा आहे. काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आहे सोलापूर जिल्ह्यातला.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील धामणगाव राहणारे नरहरी ढेकणे यांचा हा व्हिडिओ आहे. हे वृद्ध दाम्पत्य वयाच्या 80 व्या वर्षीही शेती करत असल्याचा हा व्हिडिओ काळीज पिळवटून टाकणारा आहे.

नरहरी ढेकणे यांच्याकडे थोडीशी कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. नरहरी ढेकणे यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे.  मुलबाळ नसल्यामुळे नरहरी ढेकणे आणि त्यांची पत्नी सोजर ढेकणे यांना वयाच्या 80 व्या वर्षीही संसाराचा गाडा स्वत:लाच ओढावा लागत आहे. या दाम्पत्याकडे रहायला पक्के घरही नाही. त्यामुळे शेतातच पत्र्याचे शेड उभारले आहे. जी काही जमीन आहे, त्यावर जमले तेवढं पिक घ्यायचं आणि ते पिक विकून आपलं पोट भरायचं, असा हा एकमेव या वृद्ध दाम्पत्याचा दिनक्रम आहे.

पण, एकीकडे कोरोनाचं संकट आणि त्यात अस्मानीने संकटाने या वृद्ध बळीराजा दाम्पत्याचे हाल झाले. पहिल्या पावसात मोठ्या कष्टाने शेतात सोयाबीनचे पिक घेतले होते. पण शेतात पेरलेले पिकं उगवलंच नाही. आधीच राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तशीच फसवणूक या वृद्ध दाम्पत्याची झाली. या वयात कुणाकडे बोलायचं? बोलायचं तर कुणी ऐकणार का? अशी अवस्था या दाम्पत्याची झाली. पण, तरीही या दाम्पत्याचा धीर खचला नाही. त्यांनी पुन्हा एकदा दुबार पेरणीची निर्णय घेतला. शेतात या दाम्पत्याने स्वत:च्या हाताने पेरणीयंत्र तयार केले. आजीने समोरुन ओढले आणि तर आजोबांनी पिकं पेरले.

योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? शिवसेनेचा घणाघात

एकीकडे लॉकडाउनमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अंगावर असलेलं कर्ज आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शेतकऱ्यांनी हात ठेकले आहे. पण, वयाच्या 80 वर्षी परिस्थितीशी दोन हात करून पुन्हा जोमाने शेतात उभं राहून या दाम्पत्याने नवा आदर्श घालून दिला आहे.

या गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या बळीराजाच्या संघर्ष पाहून अनेक मदतीचे हात आता पुढे आले आहे. गावातील काही जणांनी या दाम्पत्याला अन्नधान्याची मदत केली आहे.

संकलन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 6, 2020, 11:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading