'ही' असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज केल्यावर धावणार150 KM!

'ही' असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज केल्यावर धावणार150 KM!

पुढील दोन महिन्यात या बाइकचे उत्पादन सुरू होईल आणि लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर तयार करणारी कंपनी ओकिनावा (Okinawa) ने भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीनुसार नवी कोरी बाइक लाँच करणार आहे. ही बाइक सर्वात स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

फाइनाशियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कंपनीनचे एमडी आणि फाउंडर जितेंद्र शर्मा यांनी या बाइकबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.  Oki100 असं या बाइकचं नाव असणार आहे. या बाइकला तयार करण्यात दोन वर्षांचा कालावधी लागला. अशीही माहिती मिळतेय की, पुढील दोन महिन्यात या बाइकचे उत्पादन सुरू होईल आणि लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

किंमत आणि फिचर्स

या बाइकचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिची किंमत. मिळालेल्या माहितीनुसार, Oki100 ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक ठरू शकते. सोबतच या कंपनीचे हे उत्पादन 100 टक्के स्थानिक उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर तयार होणार आहे. ओकिनावा ही कंपनी चीनमधूनही काही पार्ट्स आयात करते. जितेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, यापुढे कंपनीचे प्रत्येक प्रोडक्ट हे स्थानिक उत्पादकाचा वापर करून तयार होणार आहे. त्यामुळे या बाइकची किंमत ही 1 लाखांपेक्षा कमी असणार आहे.

बाइकचे फिचर्स

या बाइकची बॅटरी, आणि टॉप स्पीड सह अन्य  स्पेसिफिकेशन्स पाहिले तर तुम्हाला यात बरंच काही मिळेल. Oki100 चं वजन हे कमीत कमी ठेवण्यात भर देण्यात आला आहे. यासाठी बाइकमध्ये  अॅल्‍‍‍‍युमिनियमचा वापर केला जाणार आहे. या बाइकमध्ये डिटेचबल Li-ion बॅटरी मिळेल. एकदा फुल चार्ज केल्यावर ही बाइक 150 किलोमीटरचं अंतर पार करेल. सोबतच या बाइकमध्ये फास्ट चार्जिंग, मागे आणि पुढे डिस्क ब्रेक्स आणि  स्मार्टफोन कनेक्टिविटी सारखे फिचर्स दिले जाणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2019, 8:10 PM IST
Tags: auto

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading