ओखी वादळाचा हर्णे बंदराला फटका

ओखी वादळाचा हर्णे बंदराला फटका

पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसलं होतं.

  • Share this:

05 डिसेंबर:  ओखी वादळाचा परिणाम  रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे भागालाही बसलाय.  पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसलं होतं.

दापोली जवळ  किनाऱ्यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर , बर्फ सेंटरचं नुकसान झालंय. ओखी वादळाचा केंद्रबिंदू गुजरातच्या दिशेने असला तरीही ओखी वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे.

आज सकाळपासूनच जोरदार वारा सुरू आहे. समुद्र अजूनही काही अंशी खवळलेला आहे, नेहमीपेक्षा लाटांची उंची सुद्धा अधिक आहे पावसाचे वातावरण असल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे .

रत्नागिरीच्या राजीवडा आणि मांडवी परिसरात भरतीचे पाणी रस्त्यावर आले होते तर सिंधुदुर्गात आचरा पिरावाडी भागातही पाण्याचं प्रमाण वाढलं होतं . मात्र रविवारच्या तुलनेत सोमवारी रात्री परिस्थिती आटोक्यात होती .  सध्या कोणताही धोका नसला तरी प्रशासनानं बचाव यंत्रणा सज्ज ठेवलीये.

First published: December 5, 2017, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading