ओखी वादळ कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता

ओखी वादळ कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातला सतर्कतेचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.

  • Share this:

02 डिसेंबर : ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातला सतर्कतेचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. येत्या ४८ तासात चक्रीवादळ महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू-केरळच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी चक्रीवादळाने आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतलाय. सध्या हे चक्रीवादळ केरळची राजधानी असलेल्या तिरूअनंतपुरमच्या 130 किमी नैऋत्य दिशेला आहे. या वादळाचा परिणाम होवा आणि कोकण किनारपट्टीवर होणार आहे.

त्यामुळे हवामान खात्याने पार्श्वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातला सतर्कतेचा इशारा दिलाय. ओखी वादळ उत्तरेकडे सरकणार असल्यानं अरबी समुद्रात वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासांत वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

First published: December 2, 2017, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading