नैराश्यातून शेतकऱ्याने संपविलं आयुष्य..3 एकरात पिकवला होता कांदा

नैराश्यातून शेतकऱ्याने संपविलं आयुष्य..3 एकरात पिकवला होता कांदा

पुरंदर तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतक-याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोपट धोंडिबा यादव (रा.माळशिरस) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. पोपट धोंडिबा यादव यांनी तीन एकरात कांद्याचे पीक घेतले होते. परंतु कांद्याला योग्य बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातून पोपट यादव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

  • Share this:

पुरंदर, 11 एप्रिल- पुरंदर तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतक-याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोपट धोंडिबा यादव (रा.माळशिरस) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. पोपट धोंडिबा यादव यांनी तीन एकरात कांद्याचे पीक घेतले होते. परंतु कांद्याला योग्य बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातून पोपट यादव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

पोपट यादव यांनी तीन एकरात कांद्याचे पीक घेतले होते. पिकही चांगले आले. परंतु कांद्याला योग्य बाजारभाव न मिळाल्याने त्यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातून पोपट यादव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यातून ते कर्जबाजारी झाल्याने आपल्या राहत्या घरी घरातील सर्व मंडळी झोपली असताना घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी घरातील मंडळी जागे झाले असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर सदर घटनेची माहिती जेजुरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. शवविच्छेदनानंतर माळशिरस येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोपट यादव हे माळशिरस विविध विकास सोसायटीचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यतील शिरुर लोकसभा मतदार संघातून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. ''गेल्या 5 वर्षात शेतीकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. सत्तेत आल्यानंतर कांद्यासह इतर शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी झगडणार. तसंच कांदा, बटाट्यावर प्रक्रिया करणारे व्यवसाय उभारणार, वनौषधी आणि शेतमालावर प्रक्रिया व्यवसाय उभारणार'', असं अमोल कोल्हे म्हणाले.

VIDEO: अमोल कोल्हे यांचा हमीभाव मिळवून देणारा 'शेतकरी अजेंडा'

First published: April 11, 2019, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading