मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा, खडकात अडकलेल्या जहाजातून तेल गळती

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा, खडकात अडकलेल्या जहाजातून तेल गळती

Taukte Cyclone:तौक्ते चक्रीवादळाचा फटका अजूनही जाणवत आहे. या चक्रीवादळामुळे पालघरमध्ये एक जहाज अडकून पडलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
पालघर, 29 मे: तौक्ते चक्रीवादळा (Taukte Cyclone) चा फटका अजूनही जाणवत आहे. या चक्रीवादळामुळे पालघरमध्ये एक जहाज अडकून पडलं आहे. चक्रीवादळात हे जहाज खडकाला आपटल्यानं अजूनही ते समुद्रात अडकलं आहे. धक्कादायक या जहाजातून आता तेल गळती सुरु झाली आहे. या जहाजात जवळपास 80 हजार लीटर डिझेल आहे, ज्याचीच आता गळती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हे जहाज पालघर (Palghar) जिल्ह्यातल्या वडराई भागातील समुद्रकिनारी अडकले आहे. डिझेलनं भरलेलं हे जहाज अलिबागहून निघालं होतं. मात्र कोकणात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा या जहाजाला देखील बसला. चक्रीवादळात हे जहाज समुद्रातील खडकांना आपटलं. अलिबाग ते पालघर जिल्हा यामध्ये जवळपास साडे तीनशे किलोमीटर अंतर आहे. हेही वाचा- कोरोनानं पत्नीचं निधन तरीही करत होता इंजेक्शनचा काळाबाजार पालघर जिल्ह्यातील वडराई परिसर बर्‍यापैकी खडकाळ असून समुद्र किनारी देखील मोठंमोठे खडक आहे. या भागातून जहाजांना जाताना त्रास होतो. स्थानिक लोकांनी जहाज अडकल्याची माहिती पोलिसांना दिली. तौक्ते चक्रीवादळानंतर हे जहाज तिथेच अडकलं असल्याचं समजतंय. या जहाजातून तेल गळती सुरु असल्याचंही सांगण्यात येतंय. हेही वाचा- या वीरपत्नीला सलाम! लेफ्टनंट ''निकिता कौल धौंडियाल'', भारतीय सैन्यात
First published:

Tags: Cyclone, Palghar

पुढील बातम्या