इंधनदरात सलग 15व्या दिवशी वाढ, पेट्रोल 15 तर डिझेल 11 पैशांची महागलं

इंधनदरात सलग 15व्या दिवशी वाढ, पेट्रोल 15 तर डिझेल 11 पैशांची महागलं

एकीकडे कर्नाटक निवडणुकांनंतर सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. इंधनदरांमध्ये सलग 15व्या दिवशी वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 28 मे : एकीकडे कर्नाटक निवडणुकांनंतर सलग तेराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. इंधनदरांमध्ये सलग 15व्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल पुन्हा एकदा 15 पैशांनी महाग झालं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर आज 86 रुपये 8 पैशांवर गेलाय. तर डिझेलही 11 पैशांनी महाग झालं आहे. मुंबईमध्ये एक लीटर डिझेलसाठी आज 73 रुपये 64 पैसे मोजावे लागणार आहेत.

या दरवाढीमुळे विरोधकांसह सर्वसामान्य देखील पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करताहेत. मात्र इंधनाचे दर आणि जीएसटीचा नेमका संबध काय याची साधी कल्पना देखील देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना नसल्याचं उघड झालंय.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर वाढत असलेला इंधन दरवाढीचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (वस्तू आणि सेवा कर) कक्षेत आणण्याचा विचार करत असले तरी त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही, असा दावा जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केला आहे. त्यामुळे आता पुढे इंधनाचे दर असेच वाढणार की त्यावर काही उपाय योजना करण्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: May 28, 2018, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading