• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश, फोटो व्हायरल झाले म्हणून अधिकाऱ्याला अटक!

कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश, फोटो व्हायरल झाले म्हणून अधिकाऱ्याला अटक!

संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे

संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे

संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे

 • Share this:
  शिर्डी, 21 सप्टेंबर : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात (shirdi sai baba) आल्यानंतर अनेक दर्शनाच्या वेळी फोटो काढत असतात. मात्र, संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केले म्हणून संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजेंद्र जगताप (rajendra jagatap) यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याचे वृत्त शिर्डीत पसरताच मोठी खळबळ निर्माण झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसंच साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे, तसा साई संस्थान ने 2018 मध्ये ही नियमच केला होता. शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या. मात्र, या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत साई मंदिरामध्ये 31 ऑगस्ट 20 21 रोजी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती. BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, अमित शहांसोबत होणार बैठक? या तक्रारीनंतर साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप, विनोद कोते, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून 501,408,465,469, 34, 66 (B), 2 (1), 66,43, 443 (B), 43 (G), 84,5 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. अटकेचे वृत्त शिर्डीत येताच साईभक्त ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. आपके हसीं पैर... पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका साईबाबा संस्थानची तसेच साई मंदिराची सुरक्षा महत्त्वाचे असताना व तसा नियम कायदा असताना त्याप्रमाणे कोरोना काळात इतर साईभक्तांना प्रवेश नसताना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मंदिरात गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता चौकशीअंती सविस्तर माहिती पुढे येईल. संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संबधित प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्यांना नेमके कोणाच्या आदेशाने अध्यक्ष असलेल्या न्यायाधिशांची बदनामी आणि रेकी करणारे फोटो समाजमाध्यमात पाठवण्याचा कोणाचा आदेश झाला हे स्पष्ट होणार आहे.. यामुळे मात्र आएस अधिकारी कान्हूराज बगाटे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: